विद्यालयाच्या जागेपायी
कुणीच इथं भांडलं नाही
अन्..देवालयाच्या जागेसाठी
रक्त इथं कमी पडलं नाही..
माझाच देव मोठा म्हणण्यात
रक्ताच्या नद्या वाहील्या
ज्ञानगंगा कोरडी पडत
ओसाड शाळा झाल्या...
शाळा अजुनही तशीच
पडक्या,तुटक्या भिंतीची
गरीब माझ्या देशामधी
उभी मंदिरं सोन्याची...
धर्मासाठी , पैशांसाठी अनेक आंदोलने पाहिली,
पण शिक्षणाच्या भल्यासाठी कुणी मोर्चा काढला नाही,
शाळे मधली दानपेटी
भरलेली कधी पाहिली नाही
अन् मंदिराची दानपेटी
रिकामी कधी राहिली नाही...
शाळेतला पालक मेळावा
पालकांवाचून राहून गेला
देवालयात चेंगराचेंगरीत
माणुस मात्र तुडवून मेला...
विद्येचं ज्ञान देऊन
गुरूजी गरीबच राहीला
अन्'अंधभक्तांचं’ दान घेऊन
पुजारी धनवान झाला...
खरंतर धर्म नावाचं पुस्तक
शाळेत कधीच उघडत नाही
अन् धर्माच्या नावाशिवाय
देशात पानही हालल नाही...
✍मास्तर...

