shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तरुणाई अभ्यासिके मार्फत सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन..!!



शिर्डी प्रतिनिधी :
 बेलखेडा येथील दि. २३ व २४ रोजी तरुणाई अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्र यांच्या मार्फत दोन दिवसीय सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आजूबाजूच्या परिसरातील एकूण २०० पेक्षाही जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.
        
सध्याची परिस्थिती पाहता स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात कुठे तरी नकारात्मक भावना निर्माण झाली आहे आणि विविध ठिकाणी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या अनुषंगाने त्यांची तयारी व्हावी व मनातील नकारात्मक भावना दूर व्हावी म्हणून या सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे आयोजन रामेश्वर राठोड, दिनेश राठोड, सुरेश राठोड, धिरज राठोड, सविलाल राठोड, प्रेमराज राठोड, बाळा राठोड यांनी केले होते.

ही स्पर्धा दोन गटांमध्ये पार पडली असून मोठा गट पारितोषिक विजेते अनुक्रमे प्रथम- रोहिदास राठोड, द्वितीय- दत्तात्रय गढरी, तृतीय- हिरालाल महेर आणि लहान गट पारितोषिक विजेते अनुक्रमे प्रथम- हृतिक राठोड, द्वितीय- (विभागून) जान्हवी सूर्यवंशी, जयेश सूर्यवंशी, तृतीय- राजनंदनी सूर्यवंशी विजेते ठरले.


समाधान चव्हाण,आत्माराम राठोड,मनोज सूर्यवंशी, किरण चव्हाण, जीवन राठोड, अनिल जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले..
पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाप्रसंगी गावातील सरपंच ज्ञानेश्वर राठोड अध्यक्षस्थानी होते. प्रमुख वक्ते म्हणून सुनिल ठाकूर होते त्यासमवेत उपसरपंच कैलास सूर्यवंशी, ग्रामसेवक बोरसे, पोलीस पाटील वसंत पवार, साईदास राठोड, अजमल राठोड, कुंजिलाल चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते.
close