झगडेवाडी ग्रामस्थांनी लाळ आणि खुरकत रोग प्रतिबंध लसीकरण जनावरांना करून घ्यावी - सरपंच रूपालीताई झगडे.
वडापुरी पशुवैद्यकीय दवाखाना मार्फत व ग्रामपंचायत झगडेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने झगडेवाडी येथे जनावरांच्या लाळ आणि खुरकत रोगप्रतिबंधक लसीकरणस प्रारंभ.
इंदापूर प्रतिनिधी: (२९ सप्टेंबर २०२१) वडापुरी पशुवैद्यकीय दवाखाना मार्फत व झगडेवाडी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने झगडेवाडी गावातील जनावरांना लाळ आणि खुरकत या रोगावरील प्रतिबंधात्मक लसीकरण राबवण्यास दिनांक २८ सप्टेंबर रोजी झगडेवाडीचे सरपंच रूपालीताई झगडे, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल झगडे तसेच ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर दादाराम झगडे अभिमन्यू झगडे ,मल्हारी झगडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये लसीकरण कार्यक्रमास शुभारंभ करण्यात आला.
हे लसीकरण पशु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर घुगे व त्यांचे सहकारी झगडेवाडी गावातील सर्व जनावरांना दोन दिवसांमध्ये लसीकरण करून पूर्ण करण्याचे नियोजन केले असून त्या पद्धतीने दि.२८ रोजी ४७० गाईंना १०० म्हशी यांना प्रत्यक्ष लसीकरण करण्यात आले.
यावेळी सरपंच रूपालीताई झगडे यांनी ग्रामपंचायत झगडेवाडी तील सर्व ग्रामस्थांनी लाळ आणि खुरकत या रोगावर रोगप्रतिबंधक लसीकरण आपल्या सर्व जनावरांना करून घ्यावी आणि लसीकरण १००% झगडेवाडीत झाले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

