shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रवादी तालुकाध्यक्षपद कोकाटेंना देण्याची मागणी ; सोशल मिडियावर पोस्टरबाजीसह कार्यकर्ते जोमात..


 प्रतिनिधी : संजय वायकर

अ .नगर : २९ /  राष्ट्रवादी- काँग्रेस पक्षाच्या नगर तालुकाध्यक्षपदासाठी सध्या वातावरण तापत असल्याचे दिसून येत आहे यातच अशोक कोकाटे यांना संधी देण्यात यावी अशी मागणी सोशल मिडियावर जोर धरु लागली आहे .

    
 अशोक कोकाटे हे सुमारे दहा ते पंधरा वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत आहेत त्यांनी यापूर्वीही अनेकदा आंदोलने विकास कामे यासाठी प्रयत्नशीलता दाखवुन नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतलेला दिसून आला त्यामुळे सोशल मीडियावर अशोक कोकाटे यांना तालुकाध्यक्षपदी संधी देण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

   त्याचबरोबर नगर तालुका अध्यक्षपदासाठी कोकाटे यांचे नावही चर्चेत आहे. माजी आमदार राहुल जगताप यांचे निकटवर्तीय म्हणून अशोक कोकाटे यांच्याकडे पाहिले जाते त्यामुळे तालुक्याच्या राजकारणात काय बदल घडतील याबाबत तालुक्यातील सर्व नागरीकानां उत्सुकता लागली आहे.

 तसेच आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांसाठी चिचोंडी पाटील हे गाव दरेवाडी गटासाठी महत्त्वपूर्ण मानले जाते त्यामुळे येथील स्थानिक पदाधिकारी यांच्याकडे पाहून मतांचा कौल दिला जातो त्यामुळे राष्ट्रवादीचे  नेते मंडळी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेे लक्ष लागले आहे.
close