================
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
जिल्ह्यात आतापर्यंत सात वेळा अतिवृष्टी झाली आहे.अगोदर कोरड्या दिवसांमुळे आणि आता अतिवृष्टीमुळे पिकांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रूपयांची भरपाई शासनाने द्यावी,अशी मागणी भाजपचे जेष्ठ नेते रमेशराव आडसकर यांनी केली आहे.
रमेशराव आडसकर म्हणाले की,यंदा अगोदरच शेतकरी अडचणीत आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही विमा कंपनीने शेतकऱ्यांना विमा भरपाईची अग्रीम रक्कम दिली नाही.त्यात पुन्हा ऑगस्टच्या शेवटी आणि दिनांक चार ते सात सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीने जिल्ह्यात हाहाकार माजविला होता आणी गेल्या आठ दिवसापासुन चालु असलेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन,कापुस,बाजरी,ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले.नद्यांना पुर आल्याने जमिनी वाहून गेल्या.अनेक ठिकाणी जीवीतहानीही झाली.माजलगाव,धारूर व वडवणी तालुक्यात अतिवृष्टीने मोठे नुकसान केले.
आता त्यातून काही उरलेले खरीप पिके व काढून टाकलेले सोयाबीन कुजून गेले आहे.कपाशी पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे.अशा कठीण काळात राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे.केवळ पंचनाम्यांचा फार्स करू नये.सर्वत्रच मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रूपये मदत द्यावी,व सरसकट पिक विमा नंजुर करावा अशी मागणीही रमेशराव आडसकर यांनी तहसिल दारांना निवेदनामार्फत केली आहे याप्रसंगी उपस्थित डॉ स्वरूप सिंह हजारी साहेब नगराध्यक्ष धारूर, श्री बालासाहेब चोले तालुका अध्यक्ष भाजपा , श्री सुनील शिनगारे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती धारूर, शिवाजी मायकर जिल्हा उपाध्यक्ष भाजपा ,श्री दत्तात्रय धोत्रे शहराध्यक्ष भाजपा ,श्री महादेव तोंडे उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती धारूर, बाळासाहेब गायकवाड उपनगराध्यक्ष नगरपरिषद धारूर, श्री मोहन भोसले शहराध्यक्ष भाजपा ,हनुमंत मुंडे , श्री बालासाहेब जाधव ,श्री नवनाथ पांचाळ, अर्जुन तिडके ,शेख गफार शेख जैनुद्दीन ,श्री गणेश बडे ,रामप्रभू मुंडे,श्री. राहुल तोंडे ,श्री दादासाहेब घोळवे, जयदेव तिडके,विनायक शिनगारे,भारत सोळंके,विलास कांदे ,बालासाहेब चव्हाण, सोमनाथ मुंडे ,बाबुभाई मिस्त्री ,सुरेश मुंडे ,कैलास बांगर, अशोक करे ,रमेश साखरे ,श्री व्यंकटी मुंडे ,चोकाराम गायसमुद्रे ,सुरेश मुंडे ,प्रदिप पुजदेकर,किशोर थोरात,नवनाथ मुंडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
================

