shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निमगाव (ह) येथे सिना माईची खणा, नारळाची ओटी भरून विधिवत पूजा केली


प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

   करमाळा: दि. २९/  करमाळा तालुक्यातील कोळगाव धरणाजवळील पूर्व भागांतील शेतकऱ्यांची जलवरदायनी सिना कोळगाव प्रकल्प १००% भरले आहे त्याबद्दल श्रम हरिणी, सिना माईची विधिवत पूजा व जल पुजन केले. कोळगाव प्रकल्प १००% भरल्यामुळे आजूबाजूच्या  गावातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण  दिसून येत होते. कोळगाव प्रकल्प १००% भरल्यामुळे शेतकऱ्यांचा शेतीचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. 

  यावेळी ज्येष्ठ महिला व माजी सरपंच मंगलताई नीळ पाटील, लता पाटील, प्रभावती नीळ , मनीषा ननवरे, अनिता शिंगण, अश्विनी भील  द्रौपदी कांबळे, या महिलांच्या हस्ते करण्यात आली.

   यावेळी सिना कोळगाव धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सतीश नीळ पाटील, संभाजी पाटील, वि.का. सोसायटी व्हा. चेअरमन अतुल नीळ, हभप हनुमंत नीळ, गहिनीनाथ बरडे, आंबरुशी भील, विठ्ठल जगदाळे, विठ्ठल लोहार, माधवराव इंगळे, लहू शिंगन, राजेंद्र ननवरे, भारत नीळ, लालू भील,व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते.
close