प्रतिनिधी : बाबासाहेब तिपुळे
दरेवाडी : दि २९ / उमेद अंतर्गत नगर तालुक्यातील गावोगावी महिला स्वयं सहाय्यता बचत गट स्थापन करण्याचे काम करत आहे .
दरेवाडी , नारायणङोह , मांङवे सांङवे ,कोल्हेवाङी ,निंबोडी आदी गावातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला . यामध्ये उमेदचे वैभव मोहिते सर नवले मॅङम यांचे गटांना मोलाचे सहकार्य लाभले . त्यांनी गावोगावी जाऊन महिलांना बचत गटाचे महत्व सांगुन गट स्थापन केले . तसेच गटांना कर्ज मंजूर करून दिले आणि बँकेकङुन महिलांना विमा कवच मिळुन दिले .
यावेळी उककडगाव चे कोमल महिला बचत गट व जगदंबा महिला बचत गटाचे अध्यक्षा सौ. शुभांगी तिपुळे ,वैशाली तिपुळे ,कल्पना म्हस्के, मनिषा पठङे ,गीतांजली तिपुळे, रेखा मोहिते, अनिता म्हस्के , विमल साठे ,स्वाती शिंदे, रंजना तिपुळे, स्वाती तिपुळे, चांदणी आदि महिला उपस्थित होत्या.
गटातील सर्व महिलांनी त्यांचे आभार मानले .

