shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जागतिक मानव अधिकार फेडरेशनने केला सामाजिक कार्यकर्त्यांचा कोरोना योद्धा रत्न पुरस्काराने सन्मान



परिस्थितीवर मात करून इतरांना सहकार्य करणाऱ्या जागतिक मानव अधिकार फेडरेशनची यशस्वीतेकडे वाटचाल - राजेंद्र आहेर

नाशिक / प्रतिनिधी

 नाशिक : दि . २९  /  सर्वसामान्य परिस्थितीवर मात करून इतरांना सहकार्य करण्याचे ध्येय उराशी बाळगून आयुष्यभर केलेल्या परिश्रमामुळे आज जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनची यशस्वीतेकडे वाटचाल होत असून या फेडरेशन मध्ये काम करणाऱ्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी जनतेवर होत असलेल्या अन्याय- अत्याचार कडे बारकाईने लक्ष केंद्रित करून सर्वप्रथम घडलेली घटना सत्य आहे की असत्य याची माहिती मिळवून फेडरेशनच्या वतीने अन्याय पीडितास न्याय मिळवून देण्याचे काम करणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे . एखाद्या प्रकरणात प्रशासनाचे गैरसमज करून कोणी व्यक्ती गोरगरीबावर अन्याय करायच्या दुष्ट हेतूने त्याच्याविरुद्ध खोट्या गुन्ह्यांची नोंद करीत असेल अशा प्रकरणात फेडरेशनच्या प्रतिनिधीने पोलीस प्रशासनास झालेली चूक लक्षात आणून दिल्यास सदरील गरीब व्यक्ती दोषमुक्त केली जाते या विश्वासाने सर्व पदाधिकारी व सदस्यांनी प्रशासनाच्या विरोधात न जाता प्रशासनास हाताशी धरून काम केल्यास कोणत्याही अडचणी येणार नाही काम करताना पदाधिकाऱ्यांचा व सदस्यांचा महसूल अधिकारी पोलीस अधिकारी वैद्यकीय अधिकारी जिल्हा परिषद अधिकारी पंचायत समिती अधिकारी अशा विविध अधिकाऱ्यांशी संबंध येत असल्याने त्यांच्याशी समन्वय साधून गैरसमज दूर करण्याची योग्यता कार्यकर्त्यांमध्ये असावी असे जागतिक मानव अधिकार फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले .

 नाशिक येथील भारत नगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात रविवार दि . 26,सप्टेंबर ,2021 रोजी सकाळी 11 वाजता जागतिक मानव अधिकार फेडरेशनच्या वतीने पदाधिकारी व सदस्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जागतिक मानव अधिकार फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर हे होते बैठकीस प्रमुख अतिथी फेडरेशनच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष श्रीमती रेखा सोलंकी, राष्ट्रीय महासचिव बाबासाहेब बनसोडे ,राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रदीप पाटील श्री राजेंद्र अहिर राव आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी राष्ट्रीय महिला अध्यक्ष श्रीमती रेखा सोलंकी राष्ट्रीय महासचिव बाबासाहेब बनसोडे राजनीती समाचार चे संपादक शेख बरकत आली उत्तर महाराष्ट्र सल्लागार वहाब खान, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल जाधव व युवा अध्यक्ष, सुनील सूर्यवंशी, राम घरत पत्रकार संघाचे संपादक अविनाश पाटील ,तसेच बुऱ्हाण पूर येथील अध्यक्ष ठाणे येथील महिला अध्यक्ष मुंब्रा येथील अध्यक्ष नाशिक शहर महिला अध्यक्ष आदींनी उपस्थित कार्यकर्त्यांना फेडरेशन ची माहिती व कार्यपद्धती याबाबत सविस्तर माहिती आपल्या भाषणातून दिली .

 या कार्यक्रमात कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी करून रुग्णांना मदत करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन च्या वतीने कोरोना योद्धा रत्न या पुरस्काराने सन्मानित करून त्यांचा सत्कार करण्यात आला.

 कार्यक्रमास मीडियाचे पत्रकार अस्लम रंगरेज मालेगाव येथील इलियास छोटू मिया शेख शाहीद कुरेशी अण्णा डोंगरे महाराष्ट्र लघु वृत्तपत्र पत्रकार संघाचे महासचिव शेख फकीर मोहम्मद पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आमीर भाई जहागीर दार साप्ताहिक लेखणीचा आवाज चे संपादक मोहसीन शेख यांचेसह फेडरेशन चे इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close