वडचुना येथील शेतकरी भाऊराव चिलगर ठरले पहिले मानकरी...
हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
हिंगोली: हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत नविन सोयाबीनची आवक चालु झाली असुन वडचुना येथील शेतकरी भाऊराव चिलगर यांनी नविन सोयाबीन विक्रीस आनण्याचा पहिला मान मिळवा असुन त्यांच्या सोयाबीनला ८ हजार १११ रुपये भाव मिळाला.यावेळी त्यांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
खरीप हंगामातील नविन सोयाबीन पहिल्यांदाच बाजार समितीत वडचुना येथील शेतकरी भाऊराव चिलगर यांनी दि.४ आँगस्ट शनिवार रोजी विक्रीस घेऊन आले होते.
यावेळी या सोयाबीनचे पुजन करुन शेतकरी भाऊराव चिलगर यांचा सत्कार करीत सोयाबीन खरेदीला सुरुवात केली.यावेळी लिलावात सोयाबीनला ८ हजार १११ रुपये भाव मिळाला.यावेळी व्यापारी बालमुकुंद जेथलीया,संजय देशमुख,रामनिवास तोष्णीवाल,प्रकाश बिडकर,नंदकीशोर झंवर,सुधाकर जैन,शिवाजी देशमुख,विष्णु सोनटक्के,संतोष रामचंद्रराव देशमुख,राहुल तोष्णीवाल,अक्षय बिडकर, पुरुषोत्तम मुंदडा,रितेश मुंदडा आदीसह बाजार समितीचे सचिव साहेबराव चिलगर,गणेश देशमुख,आर.आर.पतंगे,एल.बी.पतंगे,विलास नरवाडे,शिवाजी बुळे,राजु पवार,मुकेश देशमुख,शिवाजी तिडके,एस.टी.राठोड,शेख वसीम आदी कर्मचाऱ्यांसह शेतकरी उपस्थित होते.

