नगर प्रतिनिधी( शिवा म्हस्के)
शेतकरी बांधवांसाठी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैला विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बैल पोळा दुष्काळाचं सावट पसरलं होतं पण गेल्या काही दिवसापासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने बैल पोळ्यासाठी बाजारात खरेदीचा उत्साह वाढला आहे.
राज्यभरात हिंदू संस्कृतीचा एक भाग बैलपोळ्याचा उत्साह असतो. सकाळपासूनच आपल्या लाडक्या सर्जा- राजाला सजवण्यास, सुरुवात झाली आहे. गुंडेगाव, देऊळगाव, राळेगण, गुंणवडी , या परिसरात बैलपोळ्याची जय्यत तयारी पहायला मिळत आहे. पाऊस न पडल्याने शेतकरी राजा सण कसा साजरा करायचा या विवंचनेत होता. पण गेली काही दिवसापासून मुसळधार पडलेल्या पावसाने शेतकऱ्याच्या जीवात जीव आला आहे. आता पिकं जगतील त्यामुळे सर्जाराजाच्या कौतुकाचा आजचा दिवस बळीराजा उत्साहात साजरा करू शकतोय. तसंच नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे बैलाचा साज खरेदी करण्यासाठी दुकानदात बळीराजाने गर्दी केली होती.
बैल शेतकऱ्यांचा खरा सोबती असतो. वर्षभर तो शेतकऱ्यांसोबत राबत असतो. याच बैलाचा हा सण साजरा करण्याची परंपरा ग्रामीण भागात आहे.पण बैलपोळा साजरा करण्यास शहरातही हल्ली सुरु झाली आहे. बैल हे सामर्थ्याचे ,शक्तीचे प्रतीक आहे. बैलांनी भारताच्या राष्ट्रीय चिन्हातही स्थान मिळवलं आहे.
बैल पोळ्यानिमित्त ज्यांच्या घरी बैल नाहीत ते मातीपासून बनवलेल्या बैलाची मनोभावे पूजा करतात. आपल्या आर्थिक कुवतीप्रमाणे शेतकरी बैलांना सजावट करतात. दुपारी पूजा, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. गावातून संध्याकाळी मिरवणूकही काढली जाते.
" वर्षभर शेतात काम करणाऱ्या सर्जा-राजांना सजवत पूजन करून त्यांना पुरणपोळी खाऊ घालण्याचे महत्त्व पोळ्याला आहे.शेतकरी हा सण उत्साहाने व आनंदाने साजरा करतात. बैलांना सजवून वाजत-गाजत गावातून मिरवणूक काढली जाते. परंतु गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात कोरोनाचे सावट गडद होत चालले आहे. त्याचा परिणाम बैलपोळा सण साजरा करण्यावर दिसून येणार असल्याचे चित्र आहे"
संतोष भापकर
( उपसंरपच गुंडेगाव)

