प्रतिनिधी । मोहन शेगर,
सोनई : चांदा येथे कार्यरत असलेल्या कत्तलखाना रेॅकेटवर सोनई पोलीसांनी चार दिवसांत दुसऱ्यांदा छापा टाकला या छाप्यात दीड लाख रुपये किंमतीच्या दहा गाईची सुटका करून या वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अशोक लेलँड असा एकुण साडे सहा लाख रुपये किंमतीच्या ऐवज जप्त करण्यात आला या गाई ताब्यात घेऊन मढी येथील गोशाळेकडे सुपुर्द करण्यात आल्या.
सोनई पोलीस ठाण्याच्याचे सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व परिसरातील वाढत्या तक्रारी नंतर व जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज्ञ पाटील यांनी आदेश दिल्या नंतर सोनई पोलीसांनी चार दिवसांपूर्वी कुरेशी मोहलयात छापा टाकून सुमारे एकोणीस लाखांचा ऐवज जप्त केला होता शनिवारी पुन्हा शास्त्रीनगर येथील गाढवे वस्ती जवळ चांदा येथे एका शेतात लपवुन ठेवलेला दीड लाख रुपये किंमतीच्या दहा गाई त्यात पाच गावरान व पाच जसी गाईची सुटका करण्यात आली.
गाईचा मालका बाबतीत चौकशी केली असता सदरची जनावरे ही अताऊला शब्बीर पठाण रा चांदा या बाबत सोनई पोलीस ठाण्यात अज्ञात टेंपो चालक यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे श्रीरामपूर यांचा हस्ते सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे,ज्ञानेशर थोरात,स पो नि पोलीस हेड कॉन्स्टेबल अडकिते पोलीस नाईक बाबा वाघमोडे पो ना माने पो ना मुळे यांनी ही कामगिरी केली

