जगदीश का. काशिकर :
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप - ९७६८४२५७५७
किरीट सोमय्या बद्दल मला याबद्दल काहीच माहिती नाही मी विकास कामाला महत्त्व देतो आम्ही सकाळी सहाला कामाला सुरुवात करतो आणि विकास कामाला महत्त्व देतो लोकांच्या कामाला आणि अडीअडचणीला महत्त्व देतो. लोकांचे लक्ष वेगळ्या कारणाने दुसरीकडून डायव्हर्ट करण्यापेक्षा लोकांचे प्रश्न काय आहेत ते पहा. कोरोना संदर्भात आपली काय लाईन ऑफ ॲक्शन आहे ती माहिती घेतली पाहिजे आणि इतर अडचणी सोडवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. मी ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर होतो. हा कार्यक्रम संपल्यावर मी मुंबईला आहे या प्रकरणी माहिती घेतो त्यानंतर मी प्रतिक्रिया देतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
मुंबईनंतर पिंपरी चिंचवड आणि पुणे वाढत असताना समाविष्ट गावाला सुविधा मिळाल्या पाहिजेत. सार्वजनिक कामाला आणि मार्ग काढण्याचा माझा प्रयत्न करतो. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड माध्यमातून म्हाडाच्या घराची सोडत काढली आहे. काहींना घर घ्यायला परवडत नाही म्हणून ही सुविधा केल्याचे ते म्हणाले. तसेच पिण्याच्या पाण्याची अडचण ही गोष्ट खरी आहे. पुण्याची वाढती लोकसंख्या पाहता ही अडचण येत आहे. त्यामुळे शेतीचं पाणी हिकडं वळवायला लागत आहे. यामुळे शेतीला देखील अडचण येत आहे.
महाराष्ट्रातील प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवारसाहेब आणि आम्ही प्रयत्न करत आहोत. पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास झाला पाहिजे, काही जण झोपेत असतील तेव्हा माझं काम सुरू असतं. आम्ही शेतकरी वर्गातील आहोत, त्यामुळे शेतीला वापसा मिळाला पाहिजे. सोशल मिडियामुळे सगळे जवळ आलेत त्यातील चांगलं घ्या वाईट मार्गाला जाऊ नका.
शाळेसाठी 65 हजार कोटींचा निधी देत असल्याचे अजित पवार यांनी यावेळी जाहीर केले. खाजगी आणि शासकीय शाळांमध्ये मोठी तफावत आहे. कुठलाही मुलगा किंवा मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आपण प्रयत्नशील असून शाळेसाठी 65 हजार कोटी शाळेसाठी निधी देत आहोत, असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले.

