shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कलम १६ व कलम २१ काय आहे ?



जगदीश का. काशिकर :-
माणूस आहे म्हणजे तो आजारी पडणार आहे. रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा मानली जात होती पण आज या वैद्यकीय क्षेत्राचा बाजार मांडला आहे जागोजागी बोगस डॉक्टर यांचा सुळसुळाट आपण बघतो. ज्याला कोणतीही डीग्री नाही कोणताही अनुभव नाही असे संधीसाधू डॉ आपणास पाहावयास मिळतात. 

अशा बोगस डॉक्टर यांनी आपल्या वैद्यकिय धर्माचा बाजार मांडला आहे कोणत्याही दवाखान्यात रुग्ण हक्काची सनद लावलेली दिसत नाही. कोणत्या उपचारासाठी किती खर्च येणारं किंवा किती पैसे भरावे लागणार. याचे कोणत्याही दवाखान्यात दरपत्रक लावलेले दिसत नाही. औषधांची किंमत रुग्णांच्या नातेवाइकांना सांगितली जात नाही धर्मादाय आयुक्त यांचेकडून आपल्या जिल्ह्यात किती दवाखाने आहेत. कोणता दवाखाना कोणत्या योजनेअंतर्गत मोफत उपचार करतो याची माहिती व त्यासंबंधी माहिती सांगणारे मदतनीस कोणत्याही दवाखान्यात दिसत नाहीत. 

आपल्या कडे येणाऱ्या रुग्णांना त्यांनी ठरवून दिलेल्या प्रयोगशाळेत विविध चाचण्या करण्यासाठी पाठविणे आपल्या ओळखीच्या मेडिकल मधून औषध खरेदी करण्यासाठी आग्रह धरणे किंवा जर एखाद्या रुगनाकडे  डॉकटर यांनी सांगितलेले औषधं घेण्यासाठी पैसे नसतील तर तेच औषध त्याला त्याच्या गावांत सुध्दा उपलब्ध झाले पाहिजे   आपल्या दवाखान्यात पेशंट बरा होत नाही असे सांगून एखाद्या तज्ञ किंवा डॉकटर पेशंट पाठविणे या पद्धतीवर म्हणजे डॉकटर कट प्रॅक्टिस वर बंदी येणार आहे याविषयी सविस्तर पुढीलप्रमाणे एक पेशंट उपचारांसाठी दवाखान्यात गेलेवर जो पर्यंत डॉकटर यांचा पैस्याचा कोटा भरत नाही तोपर्यंत त्या पेशंटला डिस्चार्ज केले जात नाही यासाठी शासनाने २०१८ रोजी अर्थ संकलपिय विधेयक मांडण्यात येणार होते.

त्यातील तरतुदी पुढील प्रमाणे:-

(१) २०१८ मध्ये विधिमंडळ अर्थ संकलपिय अधिवेशनात डॉकटर व प्रकटिस वर बंदी आणणारे विधीयक मांडण्यात येणार होते.

(२) सध्या खाजगी व निमशासकीय आणि सरकारी रुग्णालयात अनेक डॉकटर आपल्या कडे येणाऱ्या रुग्णांना बाहेरच्या प्रयोगशाळेत विविध चाचण्या करण्यासाठी भाग पाडत आहेत विशिष्ट कंपनी चे औषध लिहून देणा-या डॉकटर  यांना संबंधित कंपनी कडून भ मोठ्या प्रमाणात आर्थिक मोबदला दिला जातो रुग्णांच्या खिस्यातून डॉकटर यांना कमिशन दिले जाते अशा सर्व प्रकारची गंभीर दखल घेण्याचा विचार करून या मध्ये दोन दवाखाने व दोन डाॅकटर आणि मेडिकल यांचें एक जिव्हाळ्याचे संबंध तयार झाले आहेत त्यामुळे पेशंटची बेमाफि लूट केली जात आहे.     
    
कोरोना काळात डॉकटर यांची बरिच प्रकारणे आपले मन हालवून टाकणारी होती मयताचे अवयव यांचा व्यापार बेमाफी रुग्ण उपचारांचे बिल तर काही डॉकटर यांनी मयत असणारे पेशंट जीवंत आहेत म्हणून रुग्णांच्या नातेवाइकडून. बिलाची रक्कम वसूल केली. यांच्या वर कारवाई झाली तरी सुध्दा यांची दुकानें चालूच होती. काहीजण या दवाखान्याचे परवाने व डॉकटर यांच्यावर कारवाई करा या मागणीसाठी निवेदन उपोषण केली पण त्याचा उपयोग झाला नाही  रुग्णांना मिळणारी वागणूक आपणं सर्वांनी बघितली आहे चेक अप नाही तपासणी नाही औषध अंगावर टाकणे. लांब उभे राहून बोला.  हाडाचा प्राबलम असेल तर त्या रुग्णाला ताप थंडी यांचे औषध देणारे डॉकटर आपण बघितले आहेत.  एकादा रुग्ण मरत असेल तरी डाॅकटर यांनी उपचार केला नाही आपल्या गावातील जिल्हा उप रुग्णालय मध्ये डॉकटर वेळेवर येत नाहीत. औषध बाहेरून आणायला सांगतात.  साप कुत्रं चावल्यास लागणारी लस सदैव उप जिल्हा रुग्णालयात उपलब्ध असणे आवश्यक आहे.  जे डॉकटर सरकारी दवाखान्यात कामास आहेत त्यांचे स्वताचा दवाखाना आहे. सरकारी दवाखान्यातील औषध हे डॉकटर आपल्या क्लिनिक मध्ये वापरत नसतील कशावरून ? महिन्याला येणारा उप जिल्हा रुग्णालयासाठी औषधं साठा याचा स्टाॅक रिपोर्ट आपणांस बघण्याचा अधिकार आहे. 

(३) विशिष्ट. प्रयोगशाळा. मेडिकल. स्टोअर्स  लॅब. यांनी त्या डॉकटर चे नाव सांगणे वरिल प्रमाणे विविध आग्रह करणार्या डॉ विरोधात तक्रार करणे गरजेचे आहे असे कोठेही लिहून ठेवलेले नाही की जेथे दवाखाना आहे तेथे त्याच डॉकटर यांचे मेडिकल असते त्या डॉकटर कडे उपचार घेतला म्हणजे त्याचं औषध आपणांस बंधनकारक नाही कि येथेच घेतलें पाहिजे असा कोणताही डॉकटर आपणाकडे आग्रह किंवा तगादा लावत असेलतर जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार केल्यास गुन्हा दाखल केला जाईल गुन्हा सिद्ध झाल्यास १ वर्ष शिक्षा व ५० हजार रुपये दंड. जर याच डॉकटर कडून दुसऱ्यांदा गुन्हा झाल्यास २ वर्ष शिक्षा व १ लाख रुपये दंड शिवाय त्यांचा परवाना रद्द करण्यात येणार आहे अशी तरतूद या विधेयकात आहे.

(४) हे विधेयक मंजूर झाल्यास अशा प्रकारे कायदा झाल्यामुळे सर्वसामान्य जनता गरिब गरजू लोकांना या डॉ कडून संरक्षण मिळण्यास मदत होणार आहे असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. डॉकटर यानी पेशंटला चांगली वागणूक दिली पाहिजे
डॉकटर यांनी पेशंटला उपचार पद्धती निवडण्याचा अधिकार द्यावा. डॉकटर यांनी आपल्या दवाखान्यात रुग्ण  हक्क सनद लावणे बंधनकारक आहे.

रुग्ण हक्क रुग्ण आपल्या निवडलेल्या मेडिकल मध्ये औषध खरेदी करू शकतो
रुग्ण आपलीं उपाचार पध्दती निवडू शकतो
रुग्ण महात्मा फुले आरोग्य योजनेची राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या योजनेतून अनुदान व उपचार मिळणे बाबत  हट करु शकता.
        
आपल्या भारतात अठरा पगड जातींचे लोक गुण्यागोविंदाने नांदत असतात. प्रत्येकाचे धर्म चालीरीती सणवार मंगल कार्य  तसेच विविध धार्मिक कार्यक्रम प्रत्येकाच्या धर्माच्या रिती प्रमाणे होतात त्यातच सर्वात महत्त्वाचा आणि भावनिक विधी कोणता असेल तर तो म्हणजे  अंत्यविधी करण्याची प्रत्येकाची प्रथा धर्माप्रमाणे असते. त्यात प्रामुख्याने मुस्लिम समाजात मृतदेह दफन करण्याची प्रथा आहे त्यात दफन विधी करताना धार्मिक विधी केला जातो. हिंदू समाजात दहन पध्दतीने मृत व्यक्तिला शेवटचा निरोप दिला जातो  असे विविध समाज आपल्या आपल्या धर्माप्रमाणे अंत्यविधी करतात त्यात कोणीही मृतदेहाची. अवहेलना करु शकत नाही त्याला दहन दफन करण्यासाठी अडवू शकत नाही. हा कायद्याने गुन्हा आहे.
              
अलिकडे आपण बघतो वाचतो की उघड्यावर मृतदेह टाकलें जातात. हे आपल्या धर्मानुसार अगदी खालच्या दर्जाचे कृत्य माणले जाते. संविधानात जिवंत माणसांच्या हितासाठी संरक्षणासाठी विविध कायदे कलम तयार करण्यात आले आहेत पण मला एक समजतं तोच व्यक्ती मृत झाल्यावर त्यांच्यासाठी काही तरतुद आहे का ? होय मृत्यू नंतर सुध्दा मृतदेहाला असे कायदेशीर अधिकार आहेत का ? पण जीवंत माणसाला असणारे विविध अधिकार कायदे कलम मृत्य व्यक्तिलाही लागू होतात का ? आपल्या कायदेसंहीता मध्ये मरणानंतर सुध्दा काही कायदेशीर तरतूद करण्यात आली आहे.
close