बहुजन परिषद कार्यकारी मंडळाची बैठक संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: बहुजन परिषद कार्यकारी मंडळाची बैठक श्री संत सावतामाळी मंदिरामध्ये(दि.१०) रोजी आयोजित केली होती.या बैठकीचे अध्यक्षस्थानी परिषदेचे अध्यक्ष बिभीषण लोखंडे होते.तर या बैठकीमध्ये इंदापूर तालुक्यातील काही पदाधिकाऱ्यांना संघटनेमध्ये पदाची जबाबदारी देण्यात आली.
त्या अनुषंगाने अशोक शिंदे यांना इंदापूर तालुका बहुजन परिषदेच्या कार्याध्यक्षपदी तर निमगाव चे सुपुत्र नीलेश सोनार यांची इंदापूर तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. दत्तात्रय मिसाळ यांना निमगाव निमसाखर जिल्हा परिषद गटाच्या अध्यक्ष पद दिले असून उपाध्यक्ष म्हणून सचिन कांबळे यांना जबाबदारी दिली. कळस बोरी गटाच्या उपाध्यक्षपदी अमोल कुचेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडीनंतर सर्व पदाधिकाऱ्यां चे परिषदेच्या वतीने स्वागत करण्यात आले. बैठकीचे सूत्रसंचालन परिषदेचे सचिव विजय गायकवाड यांनी केले तर बैठकीसाठी राज्य सदस्य मंडळाचे सदस्य शैलेंद्र चव्हाण संजय राऊत व परिषदेचे कार्याध्यक्ष दत्तात्रेय बाबर उपस्थित होते.

