राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला सपकळवाडी येथील निखील सुरेश घाडगे यांना शस्त्रक्रियासाठी आर्थिक हातबारा.
सपकळवाडी ग्रामस्थांकडून नामदार भरणे यांचे विशेष होत आहे कौतुक.
इंदापूर/प्रतिनिधी:-इंदापूर तालुक्यातील सपकळवाडी येथील निखील सुरेश घाडगे यांची हिरानंदानी हॉस्पीटल येथे झालेली खुब्याची शस्त्रक्रिया ( हिप जॉईंट रिस्पेल्टमेंट) राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सहकार्य भूमिके मुळे आर्थिक आधार मिळत मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. आज (दि.१० ) रोजी रुग्णाला भेटण्यासाठी राज्यमंत्री भरणे आज सपकळवाडी येथे गेले होते.
तसेच राज्यमंत्री दत्तात्र्यय भरणे यांनी शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तीच्या घरी सदिच्छ भेट देऊन तब्येतीची मायेने विचारपूस केली.तसेच ना. भरणे यांनी केलेल्या सहकार्याची माहीती शत्रुघ्न घाडगे यांनी दिली .
निखिल घाडगे यांची आर्थिक परिस्थिती बेताची व हलाखिची असल्याने शस्त्रक्रियेसाठी लागणारे ६ लाख रुपये एवढी मोठी रक्कम त्यांना व त्याच्या कुटुंबाला जमविणे शक्य नव्हते अशा परिस्थितीत सचिन सपकळ यांच्या मदतीने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन त्यांच्या शस्त्रक्रियेची व आर्थिक परिस्थितीची माहिती दिली.
भरणे यांनी सदर शस्त्रक्रियेचा सर्व खर्च उचलत तातडीने आपल्या मुंबई येथील मंत्रालयातील ऑफिसला माहीती देऊन तत्काळ निखिल घाडगे यांची शस्त्रक्रिया करण्याबाबत हिरानंदानी हॉस्पिटलला संपर्क करण्याचे सांगितले.
राज्यमंत्री भरणे एवढ्यावरच न थांबता त्यांनी निखिल घाडगे हॉस्पिटल मध्ये दाखल होण्यापासून ते त्याला घरी पाठवण्या पर्यंत दररोज संपर्क ठेऊन त्याला मुंबई येथून स्वत्तच्या भगवानराव भरणे प्रतिष्टानच्या ॲम्बुलन्स मधून घरी पोहचवले. त्यामुळे आज सपकळवाडी तील ग्रामस्थांनी राज्यमंत्री भरणे यांचे कौतुक करीत आभार मानले.
आज सपकळवाडी येथील भेटी वेळी सचिन सपकळ (सदस्य नियोजन समीती पुणे), ग्रासपंचायत सदस्य शिवाजी सपकळ, शिवाजी सपकळ , शत्रुघ्न घाडगे,तुषार सपकळ, अनिल सपकळ ,अजित सपकळ , ज्ञानेश्वर घाडगे,पांडुरंग भुजबळ,गौतम घाडगे यांच्यासह सपकळवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.


