प्रतिनिधी।एरंडोल
एरंडोल :- येथील अंजनी मध्यम प्रकल्प, या धरणाची सध्याची पाणी पातळी 62 % असून धरण फक्त 4 ते 5 फूट खाली आहे.सायंकाळी फरकांडे, नानखुर्द,अचळगाव टिटवी, धूळपिंप्री बाहुटे,चबूत्रे या अंजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे तसेच धोत्रे व भोंडन एस के एफ द्वारे 65 क्यूसेस पाणी अंजनी धरणात येत आहे त्यामुळे अंजनी धारण हे भरण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. बुधवार रोजी धरणात 62 % टक्के म्हणजे 224:85 मिटर पाणीसाठा झालेला आहे.
तरी अंजनी धरणाचे खालील नदी काठावरील गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून अंजनी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. जीवित वा वित्तहानी टाळण्याच्यादृष्टीने सर्वांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. असे आवाहन कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव व पाटबंधारे उप विभाग एरंडोल शाखा अभियंता विजय जाधव व एरंडोल नगरपालिका यांचेतर्फे करण्यात आले आहे.

