shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रबांधणी मध्ये शिक्षकांचे बहुमोल योगदान आहे- डॉ. गुंफा कोकाटे..!!



शिर्डी प्रतिनिधी :

बेलापूर असे प्रतिपादन येथील बेलापुर एज्युकेशन सोसायटीचे कला व वाणिज्य महाविद्यालय बेलापुर येथे शिक्षक दिनानिमित्त डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करताना डॉ.कोकाटे यांनी केले.त्या पुढे असेही म्हणाल्या की,तिरत्तनीसारख्या छोट्या खेड्यातील सर्वपल्ली भारताचे राष्ट्रपती होतात तर त्यांचा आदर्श ठेवून आपण प्रत्येकाने महामानवांच्या विचारांचे अनुसरण केले पाहिजे.त्यांनी लिहलेली ग्रंथसंपदा वाचून चार भिंतीच्या बाहेरची शाळा ख-या अर्थाने शिकली पाहिजे.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली.




तसेच एक वेगळा उपक्रम म्हणून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांना राखी बांधून शिक्षक दिन साजरा केला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून प्रा. देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले.विचारमंचावर कार्यालयीन अधिक्षक संदेश शाहिर , डॉ.नवाळे, डॉ ‌बाचकर ,प्रा.गायकवाड,प्रा.शेख उपस्थित होते.अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ गुंफा कोकाटे यांनी भुषविले .कार्यक्रमाचे नियोजन समिती प्रमुख सतिश पावसे यांनी केले. डॉ.अशोक माने यांनी उपस्थितांचे आभार मानले.विद्यार्थ्यांनी शिक्षकांना राख्या बांधून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

close