shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आरोग्य व्यवस्थित ठेवा,आजार परतून लावा, पोलिस ठाण्यापासुन लांब रहा- नामदार प्राजक्त तनपुरे ;ब्राह्मणी येथे जिम साहित्याचे लोकार्पण..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा राहुरी तालुका प्रतनिधी दिपक हरिश्चंद्रे.
राहुरी : तालुक्यातील ब्राह्मणी येथे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे  जीम साहित्य उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. आरोग्य व्यवस्थित ठेवा,आजार परतून लावा  ब्राह्मणीत जिम साहित्याचे लोकार्पण, व्यायाम करा पण पोलिस ठाण्यापर्यंत जाईल असे काही करू नका, तरुणांना दिला सल्ला, अर्धवट काम पूर्ण केले, जे केले त्याचे उद्घाटन केलेच पाहिजे असेही या वेळी नामदार तनपुरे यांची विरोधकांवर टीका केली
       आरोग्य व्यवस्थित असेल तर विविध आजार परतून लावले जावू शकतात.त्यासाठी व्यायाम महत्वाचा आहे. मात्र, ताकतीचा उपयोग विधायक कामासाठीच करा..उगीच पोलीस ठाण्यापर्यंत एखादी गोष्ट जाईल असे काही करू नका..असे प्रतिपादन नामदार तनपूरे यांनी केले.
         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक विठ्ठलराव मोकाटे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेंद्र बानकर यांनी केले.रस्ते,पाणी,वीज या मूलभूत सुविधासह विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास नामदार तनपुरे यांनी व्यक्त केला.
        विजेच्या डीपीच्या उद्घाटनावरून विरोधक टीका करतात. शेवटी जे केले त्याचे उद्घाटन केले पाहिजे. त्यात गैर काय? असा सवाल उपस्थित करत नामदार तनपुरे यांनी माजी आमदार कर्डिले यांचे नाव न घेता टीका केली.
अर्धवट काम पूर्ण केले. व्यायाम शाळेच्या इमारतीवर माजी आमदार यांचे नाव होते.अन् पुढे मंडप टाकला होता. त्याकडे पाहून नामदार तनपुरे म्हणाले जिम साहित्य देवून अखेर व्यायामशाळेचे अर्धवट काम पूर्ण झाल्याचा आनंद ही वाटला.

     यावेळी रंगनाथ मोकाटे बाळासाहेब देशमुख, माणिक तारडे, भारत तारडे, प्रशांत शिंदे, शिवाजी राजदेव, विश्वनाथ हापसे, जिल्हा क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरंगे, राष्ट्रीय कबड्डी पंच संकेत शिंदे आदीसह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

        जिम साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल बजरंग फिटनेस क्लबच्या वतीने हराळे, कृष्णा धामणे,आकाश राजदेव, अजित वने संकेत खुळे, यांनी आमदार तनपुरे यांचा सत्कार केला.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक गणेश हापसे यांनी तर आभार पै सोमनाथ हापसे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मल्ल विद्या महासंघाचे तालुकाध्यक्ष पै. सोमनाथ हापसे मित्र मंडळ व बजरंग फिटनेस क्लबच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे संपर्क-7350591600.
close