shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बेलापूर सोसायटी शैक्षणिक क्षेत्रात रचनात्मक व गुणात्मक भरीव योगदान देऊ - ॲड.शरद सोमाणी..!!

 


शिर्डी प्रतिनिधी :

बेलापूर असे उद्गार येथील बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे कला व वाणिज्य महाविद्यालयात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्यात त्यांनी काढले. सोमाणी पुढे असेही म्हणाले की, 24 वर्षांच्या संघर्षानंतर हे यश मिळाले आहे. संस्थेचा चेंज रिपोर्ट मंजूर झाला असून आता पुन्हा नवनिर्वाचित पदाधिका-यांची निवड झालेली आहे. ही संस्था पुढेही रचनात्मक, गुणात्मक व  दर्जात्मक कार्य करेल, महाविद्यालय पुन्हा नॅकच्या सेकंड सायकलसाठी सज्ज झाले आहे. महाविद्यालयाचा व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यायलायांना उत्कृष्ट निकालाची परंपरा आहे तसेच प्रत्येक विद्यालय गुणात्मक व दर्जात्मक असा नावलौकिक कमवेल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.या कार्यक्रमात सोमय्या ट्रस्ट प्रतिनिधी मधुकर दराडे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, बेलापूर एज्युकेशन सोसायटीला व सौमय्या ट्रस्टच्या कार्याला खूप मोठा इतिहास आहे. 





त्यामुळे शिक्षकांनी आपापल्या क्षमता वाढवाव्यात.विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रेरणादायी वातावरण तयार करावे, विद्यार्थ्यांचा सर्वंकष व्यक्तिमत्व विकास करावा असे त सांगून त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले..शिक्षक प्रतिनिधी म्हणून जेटीएसच्या उपप्राचार्या सुनिता ग्रोवर ,जेटीएसचे उपमुख्याध्यापक कुंभार सर यांनी मनोगते व्यक्त केले.सत्कार सोहळ्यासाठी भेर्डापूर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तांबेसर ,गोंडेगाव माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक खानसर,कमालपूर विद्यालयाचे पडळकरसर ,मुठेवडगाव माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मोरेसर आवर्जून उपस्थित राहिले.महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.गुंफा कोकाटे यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. सर्व प्राध्यापकांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.अध्यक्षीय सूचना प्रा.शेख यांनी मांडली तर अध्यक्षीय अनुमोदन डॉ.अशोक माने यांनी दिले.बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन गणपतलाल मुथ्था यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषविले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.विलास गायकवाड व डॉ.अशोक माने यांनी केले. प्रा. प्रकाश देशपांडे यांनी आभार मानले.

close