शिर्डी । प्रतिनिधी :-
शिर्डीत नव्याने रूजू झालेले पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील साहेब यांचा सन्मान सोहळा कार्यक्रम ठेवण्यात आले होते.त्यावेळी सन्मान करताना ते म्हणाले की, शिर्डी व शिर्डी परिसरातील गुन्हेगारी नष्ट करून कायदा व सुव्यवस्था चांगल्या रितीने राबविणार व शिर्डी पोलिस स्टेशन चे नाव लौकिक करणार असल्याचे निक्षून सांगितले.
यावेळी नव्याने रूजू झाले म्हणून पोलिस निरीक्षक श्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार साईबांबाचे सेवक हजी अब्दुलबांबाचे वंशज व मुस्लिम सेवा संघ तालुका अध्यक्ष गफ्फारखान पठाण,वसिम पठाण ईम्रान शेख नदीम पठाण यांचा कडुन.करण्यात आला व पुढील कार्यास हार्दीक शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना म्हणाले, दिवसेंदिवस शिर्डी व शिर्डी परिसातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालल्यांने याकरिता शिर्डी पोलिस स्टेशनला कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक ची गरज होती.साईबांबानी सबका मालिक एक सर्वधर्मसमभावाचे शिकवण लक्षात ठेवून कर्तबगारीने कार्य करीत साईबाबा नगरीत व परीसरात गुन्हेगारीचा बिमोड करतील अशी आशा व्यक्त करीत गफ्फारखान पठाण यांनी सांगितले .
यावेळी उपस्थित सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री दिपक गधांले साहेब. सहाय्यक पोलिस निरीक्षक बारकु जाणे, उप पोलिस निरक्षक प्रविण दातरे, वैभव रुपवते सर्व पोलिस कर्मचारी आदि मान्यवर उपस्थित होते.

