जगदीश का. काशिकर:-
परभणी: दिनांक २७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा असून या भारत बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी आज परभणी येथे पत्रकार परिषदेत केले.
देशभरातील १०० पेक्षा जास्त असंघटीत कामगार, विद्यार्थी, कर्मचारी, महिला, प्राध्यापकांच्या विविध संघटनांनी भारत बंदची हाक दिली असून सकाळी सहा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत हा बंद चालणार आहे, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला खासदार फौजिया खान उपस्थित होत्या.

