नगर प्रतिनिधी:-(शिवा म्हस्के)
"विवाह" हे एक पुरुष व स्त्री अश्या दोन व्यक्तीमधील सामाजिक बंधन आहे. हिंदू धर्मीयांत हा संस्कार आहे, तर अन्य धर्मीयांत हा कायदेशीर करार असतो. विवाह हा संतती किवा वंश पुढे नेण्यासाठीचा कायदेशीर व सामाजिक मार्ग आहे. विवाह संस्था ही संस्कृतीस आणि उपसंस्कृतीस अनुलक्षून विविध पद्धतींनी पतिपत्नींमधले जवळकीचे आणि लैंगिक नाते मान्य करते. विवाहामुळे दोन व्यक्तींचे नव्हे तर दोन कुटुंबे आणि त्यांचे नातेवाईक नात्याने जोडले जातात. या नात्यास लग्नगाठ म्हणतात. लग्न हे पवित्र बंधन आहे.
नगर सोलापूर रस्त्यावरील मौजे दहिगाव येथील ऐतेहासिक श्रीराम मंदिर देवस्थान असुन प्रभु श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीवर आज श्री राम मंदिर देवस्थान मालकीचे मंगल कार्यालयाचे काम आज पुर्ण झाले मुळे आज या परिसरातील मंगल कार्यालयात प्रथम विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
हे मंगल कार्यालय देवस्थानचे असलेल्या मुळे हे विवाह सोहळ्यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाते.
आज चार हा प्रथम शुभविवाह सुभाष आणि सुनिता यांचा शुभ विवाह अग्नी ला सात प्रदक्षिणा घालून सात जन्माची गाठ बांधली देव ब्राह्मण अग्नी ला साक्ष ठेवून विवाहबंधनात अडकले या शुभ मुहूर्तावर नववधू वराच्या हस्ते या ठिकाणी वृक्षारोपण करून एक सामाजिक संदेश देण्याचे काम केले.
समाजा प्रति आपण काहितरी केलं पाहिजे या दृष्टिकोनातून आज वृक्षारोपण करण्याचं ठरवलं होतं असं मत नवं वर-वधू सुभाष आणि सुनिता या नवीन दांपत्याने या वेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. कोरोनाचे सर्व नियम पाळुन मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थित हा विवाह सोहळा पार पडला.
या वेळी विवाह सोहळा साठी उपस्थित असलेले मान्यवर दत्तात्रय म्हस्के,उपसंरपच महेश म्हस्के,मधुकर म्हस्के, ग्रा.प. सदस्य बाळासाहेब हंबडेॅ, भानुदास ढेरे, उमाकांत जावळे, श्री राम ट्रस्ट अध्यक्ष अन्शाबापु म्हस्के, सेवा सोसायटीचे चेरमन महादेव म्हस्के, श्री राम ट्रस्ट विश्वास्त नाना गायकवाड, सुनील म्हस्के, बाबासाहेब कावरे,सागर देवतेस, आदी मान्यवर उपस्थित होते.

