शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा तालुका प्रतिनिधि दिपक हरिश्चंद्रे.
शिर्डी : शिर्डीच्या श्री.साईबाबा संस्थानच्या ठाकरे सरकारने नवनियुक्त केलेल्या विश्वस्त मंडळाला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अवघ्या पाचच दिवसांतच स्थगिती दिली आहे.त्यामुळे विश्वस्त मंडळाचे भवितव्य आता न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे.
विश्वस्त मंडळाशी संबंधित प्रकरण न्यायालयात सुरू असताना न्यायालयाला अवगत न करता नव्या मंडळाने सूत्रे कशी स्वीकारली? अशी विचारणा न्यायालयाने केली असून यावर २३ सप्टेंबरला म्हणणे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. राज्यातील सरकारने विश्वस्त मंडळ जाहीर करताना राष्ट्रवादीचे आ. आशुतोष काळे यांची अध्यक्षपदी तर शिवसेनेचे ऍड. जगदिश सावंत यांची उपाध्यक्षपदी निवड केली. या संदर्भात उत्तमराव शेळके,संजय काळे, संदिप कुलकर्णी यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केल्यानंतर आज झालेल्या सुनावणीत नवनिर्वाचित विश्वस्त मंडळाला स्थगिती दिल्यानंतर आता न्यायालयीन निर्णयावर या विश्वस्थांचे भवितव्य अवलंबून आहे.
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार 23 सप्टेंबरपर्यंत कोणताही निर्णय घेता येणार नाही. महत्वाची बाब म्हणजे न्यायालयाच्या परवानगीनंतरच सरकारने नियुक्त केलेल्या विश्वस्त मंडळाला धोरणात्मक निर्णय घेता येणार आहे. गेल्या दोन वर्षापासून साई संस्थानचा कारभार तदर्थ समितीकडे होता.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे,(तालुका प्रतिनिधी )📲7350591600

