सोमवार दि.२७/०९/२०२१ रोजी होणार रस्त्यांवरील खड्डयांत व्रुक्षलागवड आंदोलन..!
संगमनेर (प्रतिनिधी) :- वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील सबंधित प्रशासनाकडुन उडवाउडवीची उत्तरे तसेच कुठलीही कार्यवाही झाली नसल्याने साकुर पठारभागातील ग्रामस्थ व शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतीने वृक्ष लागवड आंदोलन करण्यात येणार आहे.तहसीलदार,उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, स्थानिक आमदार, खासदार, पालक मंत्री, जिल्हा पोलीस अधीक्षक, घारगांव पोलीस स्टेशन तसेच सबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना सदर निवेदन देण्यात आले आहे.
शिवप्रतिष्ठाण, महाराष्ट्र राज्य संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी पाठपुरावा करून देखील सबंधित प्रशासनाने योग्य ती कार्यवाही न केल्यामुळे सोमवार दि.२७/०९/२०२१ रोजी सकाळी १०.०० वा साकुर पठार भागातील नागरिकांच्यावतीने रस्तावरील खड्डयांत वृक्षलागवड आंदोलन करण्यात येणार आहे.
साकुर पठार भागातील बहुतांश रस्ते हे खड्डेमय, चिखलमय झाले असून अपघातांचे प्रमाण देखील खुप वाढले आहे. शेतकऱ्यांना मालवाहतूक करण्यासाठी खुप अडचणी निर्माण होत आहेत.
त्यामध्ये मुख्यत्वे..
१.रणखांब फाटा ते दरेवाडी
२.साकुर ते नांदुर खंदरमाळ (जांबुत मार्गे)
३.साकुर ते बिरेवाडी फाटा
(१ किमीचे नवीन डांबरीकरण २ महीन्यात झाले खड्डेमय इतर सर्व रस्ताच खड्डेमय-४ किमी)
४.मांडवे बुद्रुक ते वरवंडी
वरील निवेदनाची तातडीने दखल न घेतल्यास खड्डेमय झालेल्या रस्त्यांवर वृक्षलागवड करून तीव्र आंदोलन करण्यात येईल येणार आहे.
साकुर पठार भागातील तमाम जनतेच्यावतीने या आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे. तरी सदर निवेदनावर जनसामान्यांच्या होणाऱ्या हाल-अपेष्टा लक्षात घेऊन योग्य ती कार्यवाही व्हावी असे निवेदनात म्हटले आहे.असा ईशारा दिल्यानंतर देखील प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही तसेच कार्यवाही केली नाही.
रणखांब फाटा ते दरेवाडी
सदर रस्त्याची जबाबदारीच सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच प्रधानमंत्री ग्राम सडक योजना दोन्ही विभाग देखील जबाबदारी स्वीकारत नाहीत.
२०१९ ला झालेल्या सदर रस्त्याला गेली दोन वर्षांपासून कोणी वालीच उरला नाही तर या रस्त्याचे काम होणार कसे ? असा प्रश्न ग्रामस्थांना सतावत आहे. सोमवारी रणखांब फाटा ते दरेवाडी येथे सकाळी १०.०० वाजता वरवंडी ते मांडवे बुद्रुक सकाळी १०.४५ वाजता बिरेवाडी फाटा ते साकुर सकाळी ११.४५ वाजता आणि साकुर ते नांदुरखंदरमाळ १२.१५ वाजता सदरील रस्त्यावरील खड्ड्यात वृक्ष लागवड करून आंदोलन करण्यात येणार आहे. असे संबंधित विभागाला कळविण्यात आल्याची माहिती शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष शिवश्री राहुल ढेंबरे पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
तसेच आंदोलन स्थळी कोवीड विषाणुचा प्रादुर्भाव लक्षात घेता सामाजिक अंतर पाळावे तसेच मास्क वापरावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
दैनंदिन जिवनात खड्डेमुक्त रस्ते काळाची गरज-शिवश्री.राहुल ढेंबरे पाटील
दळणवळणासाठी रस्ते हेच पठारभागाचे मुख्य स्रोत असल्यामुळे शेतकऱ्यांना मालवाहतूक, खते-औषधे आणण्यासाठी तसेच प्रवास करताना नागरिकांना जिव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
शासनदरबारी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेतली जात नसेल तर अंदोलनाशिवाय पर्याय नाही असे शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष शिवश्री.राहुल ढेंबरे पाटील यांनी म्हटले आहे.

