प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी:-
केज शहरात रात्री 11/12 च्या दरम्यान कानडी रोडवर भगवान बाबा चौकात अज्ञान वाहनाच्या धडकेत केज शहरातील दोन मोटारसायकल स्वार युवकांचा घटना स्थळीच म्रुत्यु झाला आहे तर एक युवक जखमी झाला आहे.
संबंधित व्यक्ती हे केज शहरातील होते व काही कारणास्तव बाहेर आले होते आपले काम झाल्यानंतर घराकडे जात असताना कानडी रोड भगवान बाबा चौक येथे अज्ञान वाहनाने जोराची धडक दिल्याने दोघे जागीच ठार तर एक जन जखमी झाला आहे. मयतांचे नावे सुमित सदिपान सिरसट वय१८ व सुजित सुरेश राऊत वय २० वर्षे ( फुले नगर) आहेत. तरविजय कुमार पाडूरग घोळवे जखमी झाला आहे. पुढील तपास केज पोलीस प्रशासन करीत आहे.
केज शहरात रस्त्याचे काम अनेक महिने झाले तरी संथ गतीने चालू आहे. एका बाजूने पुर्ण पणे रस्त्या खोदलेल्या अवस्थेत आहे त्यामुळे एकच बाजूने वाहतूक चालू आहे. त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. सदरील एच पी एम व मेघा कंपनी यांनी केज शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे व लवकरात लवकर करून घ्यावे अशी मागणी केज शहरातील नागरिक, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात करत आहेत. काम लवकरात लवकर झाले तर अपघाताना निश्चित आळा बसेल.



