प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. ५/ केडगाव तालुका करमाळा येथील लक्ष्मण सुभाष लोकरे यांची वर्धा जिल्ह्यातील आष्टी पोलिस स्टेशन चे इन्चार्ज म्हणून नेमणूक झाली त्यामुळे केडगाव ग्रामस्थ यांनी जिल्हा परिषद शाळा केडगाव येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. A. P. I. लक्ष्मण लोकरे यांचे गाव करमाळा तालुक्यातील केडगाव शेतकरी कुटुंबातले. डिग्री प्राप्त केल्यानंतर स्पर्धा परीक्षेचे स्वप्न उराशी बाळगून कठोर परिश्रम घेऊन अभ्यास केला व आपले स्वप्न पूर्णत्वास नेले आणि पोलीस अधिकारी झाले .
काही वर्ष मुंबई येथे P. S. I. पदावर नोकरी केल्यानंतर त्यांचे A. P. I. पदि प्रमोशन होउन त्यांची वर्धा जिल्ह्यातील आष्टी पोलीस स्टेशन चे ठाणेदार म्हणून नियुक्ती करण्यात.
आली त्यावेळी चिखलठाण चे केंद्र प्रमुख भारत पांडव, केडगाव शाळा मुख्य ध्यापिका पांडव मॅडम, तसेच शिक्षक लांडगे सर, सालगुडे मॅडम , गुताळ मॅडम, गावातील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर माळी, उपाध्यक्ष नागनाथ बोराडे, ग्राम सचिव राऊत, चिखलठाण गावातील प्रतिष्ठित नागरिक चव्हाण, केडगाव शाळा व्यवस्थापन समिती सदस्य वैभव बोराडे, केडगाव मधील प्रतिष्ठित नागरिक पांडुरंग लोकरे, राम लोकरे, माऊली पालखे, सतीश सोनवणे, उपस्थित होते.
यावेळी केडगाव येथील शाळेची अधिक प्रगती तसेच चांगले विद्यार्थी घडण्याबाबत A. P. I. लक्ष्मण लोकरे व उपस्थित मान्यवरांनी चर्चा केली.

