shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पर्यावरण जनजागरण (१०३) ..!औषधी वृक्ष :अर्जुन Terminalia (Roxb) W.A



हा वृक्ष मराठी भाषेत अर्जुन सादडा, पांढरा आईन, तर हिंदी मध्ये कहू, कोहू, संस्कृतमध्ये अर्जुन:इंद्रदुम या नावाने ओळखला जातो. 

या वृक्षाची साल व पाने औषधासाठी वापरतात.
विशेष करून अर्जुनसालीचा काढा रक्तशुद्धीस उपयुक्त, कफ,पित्त, वातनाशक, पोटातील कृमीनाशक, हृदयाला बळकटी देणारा, कामोत्तेजक,  मुकामार, मोडलेली हाडे सांधणारा, दाहनाशक, पंडुरोगनाशक, साखरेचे प्रमाण कमी करणारा, मूत्राचे प्रमाण वाढविणारा, जखमेतील पू नाश करणारा, कांती सतेज करणारा असा आहे.

अर्जुनाच्या सालीमध्ये ४३% चुनायुक्त क्षार व ३४ टक्के शुद्ध क्षार असतात. अर्जुन सालीचा वापर दंतमंजन म्हणून करावा, यामुळे हिरड्या मजबूत होतात. दंतमंजन पोटात गेले तरी ते आरोग्यास फायदेशीर ठरते. टुथटेस्ट वापरली की तोंड धुताना पाण्याचा अतोनात वापर होतो व  पाणी प्रदूषित होते. हा अपव्यय दंतमंजनाने टाळता येतो. गटारातून नदीकडे जाणाऱ्या पाण्यात अर्जुन सालीचा अंश असेल तर ते जलसृष्टीतील प्राण्यांना पोषकच ठरते  व नदी शुद्ध करण्यास हातभार लागतो.  त्यामुळे अर्जुन सालीची पावडर दात घासायला वापरली तर ते पर्यावरण रक्षणाचे काम ठरते. अर्जुनाच्या ताज्या पानांचा रस कानदुखीवर गुणकारी आहे.
अर्जुन साल बाजारामध्ये सहजगत्या उपलब्ध असते.  वनविभागाने पुणे येथील सावित्रीबाई पुणे विद्यापीठात औषधी वृक्ष/वनस्पती उपलब्ध करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. तसेच महाराष्ट्रातील ठिकठिकाणी असलेल्या कृषी महाविद्यालयातून औषधी व सुगंधी वनस्पतींची उपलब्धता सहज साध्य आहे.

वृक्ष/ वनस्पती या मानवास अत्यंतिक उपयोगाची असून त्यांची ओळख करून घेतल्यास मानवाचे आरोग्य आणि निसर्गाचे पर्यावरण साधने सहज शक्य आहे. यासाठी आरोग्य/पर्यावरण साक्षरता मोहिमेत आपला सहभाग नोंदवा व आपल्या मित्रांना पर्यावरण साक्षरतेचा संदेश पोहोचवा. 

कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे यांच्या विद्यमाने पर्यावरण जनजागरण मोहिमेंतर्गत प्रसारित.
लेखक : चंद्रकांत शहासने, निसर्गोपचारक. पुणे.
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५
close