shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी वि.का.स. सोसायटीकडून 15% डिव्हिडंट व ठेवव्याज रु. 10 लाख बँकेत करण्यात आले वर्ग..!

शिर्डी । प्रतिनिधी :-
आज शिर्डी वि.का.स. सोसायटी मधै दरवर्षी प्रमाणे दिवाळी पूर्वी कर्जदार सभासदांच्या शेअर्स ठेवीवरील डिव्हिडंट दिवाळी पूर्वी देत असतात.नुकतीच मागिल महीन्यात वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली त्यामधै शेअर्स रकमेवर 15% डिव्हीडंट व ठेवीवर 9% व्याज रक्कम देण्याचे निश्चित केले होते.


त्याप्रमाणे आज प्रातिनिधीक स्वरुपात काही जेष्ठ सभासदांना हा डिव्हीडंट चेकने संस्थेचे प्रमुख नेतृत्व मा.कैलासबापू कोते पा. व संस्थेचे मार्गदर्शक व जेष्ठ संचालक श्री ज्ञानेश्वर आबा गोंदकर पा. यांचे हस्ते जेष्ठ सभासद सर्वश्री भानुदास मामा गोंदकर पा, जानकुदादा गायके पा, हरिभाऊ बनकर, केशवराव गायके पा., रमेशराव कोते पा, एकनाथ शेळके पा, चांगदेवराव बनकर, सोपानदादा गायकवाड व पोपटराव शिंदे यांना चेक वाटप केले.उर्वरित सभासदांचे बँक खात्यात रु. 8  लाख 36 हजार रु. डिव्हीडंट व ठेवीवरील व्याजापोटी 1 लाख 44 हजार रु. बँकेत  जमा करण्यात आला.


तसेच संस्थेचे मा.चेअरमन स्व.नानासाहेब जगताप पा. यांचे स्मरणार्थ गणेशचे व्हा.चेअरमन श्री प्रतापराव जगताप यांनी रु. 1 लाख ठेव ठेवुन त्या ठेवीचे व्याज रक्कम गरजु सभासदास किंवा गरीब सभासदाचे मुलाचे उच्च शिक्षणास देण्याचे सांगितल्याने मागिल वर्षाची व चालु वर्षाची रक्कम श्री रविंद्र सर्जेराव कोते पा. व श्री बाबासाहेब पाराजी काटकर यांना प्रत्येकी रु.9000/- चे चेक वरील मान्यवरांचे हस्ते देण्यात आले.


याप्रसंगी संस्थेचे चेअरमन श्री विजयराव कोते पा., व्हा.चेअरमन श्री बाळासाहेब गायकवाड व संचालक सर्वश्री वसंतराव शेळके पा, बाबासाहेब गोंदकर पा, विनायकराव कोते पा, आप्पासाहेब कोते पा, रविंद्र कोते पा, अशोकराव गोंदकर पा., साईराम गोंदकर पा,विलास वाघ, सौ.मिनाक्षी गोंदकर पा, सौ.ताराबाई कोते पा, श्रीमती रोहीणी शेळके पा, सचिव श्री संदिप बढे यांचेसह नगरसेवक श्री सुजित गोंदकर पा, प्रमोद गोंदकर पा, विकास कोते पा..हे उपस्थित होते..
close