प्रतिनिधी । एरंडोल :-येथे रेड क्रॉस सोसायटी जळगाव व दशरथ महाजन मित्र परिवारातर्फे भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन, तसेच गरीब व गरजू नागरिकांना धान्य कितचे वाटप व ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांच्या हस्ते करण्यात आले तर अध्यक्षस्थानी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ हे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, नगरसेविका कल्पना महाजन, हर्षदा महाजन, माजी नगरसेवक संजय महाजन, भालगाव येथील माजी सरपंच कैलास पाटील, ग्रामपंचायत सदस्य विनोद पाटील, निलेश मराठे अरुण महाजन गजू महाजन हे मान्यवर यावेळी उपस्थित होते.
माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन मित्रपरिवार व रेड क्रॉस सोसायटी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरास पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे एका अपंग व्यक्ती ने सुद्धा रक्तदान करून आपले कर्तव्य बजावले होते. या रक्तदान शिबिरास रेड क्रॉस सोसायटीच डॉ. शंकरलाल सोनवणे, अनिल भोळे, उमाकांत शिंपी, दीक्षा पाटील, अन्वर खान, यांनी परिश्रम घेतले.
नितीन महाजन यांनी खोल गल्ली येथे आयोजित केलेल्या( फिफ्टी पुअर पीपल)गोर गरीब व गरजू नागरिकांना धान्याचे किटचे वाटप यावेळी करण्यात आले. तसेच ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रमोद महाजन, अरुण महाजन ,अनिल महाजन, गजू महाजन, नितीन महाजन, सागर महाजन, महेश महाजन, नाना महाजन, आकाश महाजन, भूषण महाजन, संजीव महाजन, कल्पेश देशमुख, कमलेश महाजन, समाधान महाजन,योगराज पहेलवान, भावलाल महाजन, कल्पेश महाजन, सचिन महाजन, सुनील मानूधने, प्रसाद दंडवते, स्वप्नील महाजन, सह अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप बोडरे यांनी केले आभार प्रदर्शन गोपाल महाजन यांनी केले.

