धुळे । प्रतिनिधी :-साक्री तालुक्यातील घोडदे येथील महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्राचार्य रमेश हरिश्चंद्र गवळी यांचा सेवानिवृत्ती चा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेतील निवृत्त प्राचार्य युवर सर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पदवीधर मतदार संघाचे आमदार सुधीर तांबे, संस्थेचे चेअरमन व्ही बी पवार, व्हाईस चेअरमन व्ही एस पाटील, संस्थापक अध्यक्ष एस के पाटील, एस एम पाटील, टीडीएफ चे अध्यक्ष युवराज पवार हे होते यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले प्राचार्य श्री गवळी यांनी आपल्या आयुष्यातील ते 33 वर्ष शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी घडविण्यात घालवले असून त्यांच्या हातून मोठमोठे विद्यार्थी घडले असून त्यांना आदराने व उच्च जागेवर गेले असले तरी त्यांना नेहमीच भेटायला येत असतात. असे गौरवोद्गार शिक्षक आमदार श्री तांबे यांनी काढले.
यावेळी तांबे यांच्या हस्ते श्रीफळ शाल स्मृतिचिन्ह व सोन्याची अंगठी व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या सेवानिवृत्ती बद्दल माजी उपसरपंच न्याहळोद देविदास जिरे, निवृत्त शिक्षक भगवान रायते , नारायण जिरे,पाणीवाटप संस्थेचे चेअरमन सामोडे दिलीप घरटे, साई प्रतिष्ठान चे अध्यक्ष संजय महाजन, आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

