राहुरी । प्रतिनिधी :-
श्री सुनील दायमा संपादित "वैचारिक संघर्ष" या दिवाळी अंकाचा छोटेखानी प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
"साप्ताहिक वैचारिक संघर्ष " हा दिवाळी विशेषांक दरवर्षी प्रकाशित होतो. हा विशेषांक दर्जेदार व सर्वांसाठी वाचनीय असतो. या अंकासाठी राहुरीतील अनेक वाचक समाज बंधु जाहीराती देऊन ह्या विशेषांकास योगदान देतात.
संपादक सुनील दायमा यांच्यावर अनेक वाचकरसिक जाहीरात देऊन आपले प्रेम व्यक्त करतात. यामुळे सूनिल दायमा देखील दिलखुलासपणे वाचकांना या विशेषांकातुन दिवाळीची खास मेजवानी देऊन वाचकांचे आभार मानण्यात कधी कमी पडत नाही.
हा समारंभ केशर उद्योग समुहाचे अध्यक्ष श्री सागर भाऊ तनपुरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला . त्यावेळी त्यांनी "सा.वैचारिक संघर्ष" ची दिवसेंदिवस उन्नती होवो, या वृत्तपत्रातून गोर -गरिब, दीन दलितांना व सर्वांना न्याय मिळावा या अपेक्षा व्यक्त केल्या.
यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

