shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भरधाव वेगाने जाणाऱ्या बोलेरो गाडीने साईडला पायी चालणाऱ्या 7 वर्षीय बालकास उडवले-बालक जागेवरच ठार ,नागरिकांच्या सतर्कतेमुळे सुसाट वाहन पकडण्यात आले...!


             प्रतिनिधी/प्रमोद चौधरी
एरंडोल:- येथे म्हसावद रस्त्यावर शहरापासून तीन किलोमीटरच्या अंतरावर रस्त्याच्या साईडला आजीचा हात पकडून जात असलेल्या सात वर्षीय बालकास भरधाव वेगाने जाणाऱ्या बोलेरो या वाहनाने जोरदार  धडक दिली व त्या ठिकाणी  वाहन न थांबता बोलेरो गाडी घेऊन म्हसावद कडे पळुन जात असतांना त्यांचा 8 किलोमीटर पाठलाग करत शेवटी रस्त्यावर ट्रॅक्टर ट्रॉली आडवे करून त्या बोलेरो वाहनास थांबवण्यात आले.व बोलेरो वाहन व चालक यास पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. 
 बोलेरो गाडीला जोरदार धडक मारल्यामुळे या सात वर्षीय बालकाचा जागेवरच मृत्यू झाला होता.
याबाबत सविस्तर माहिती अशी की
 आज सकाळी 10.30 वाजेच्या भवानी नगर, एरंडोल येथील भवानी मातेच्या मंदीरात उमरदे गावातील जिजाबाई अर्जुन पवार यांचे घरातील धार्मिक कार्यक्रम असल्याने  रावसाहेब सोनवणे यांचा मुलगा पवन वय 7 वर्षे आपली आजी गंगुबाई सुरेश पवार सोबत व  गावातील सखुबाई, अरुणाबाई, मंगा नाईक अशांसह एरंडोल येथे कार्यक्रमासाठी गेले होतो. कार्यक्रमाचे ठिकाणी जेवण करुन दुपारी 02.15 वाजेच्या सुमारास दुपारी  गंगुबाई सुरेश पवार व नातू पवन याला सोबत घेवून सखुबाई, अरुणाबाई मंगा नाईक अशांसह एरंडोल म्हसावद रोडने उमरदे येथे घरी जाण्यासाठी रस्त्याचे डाव्या बाजुने नातुचा हात धरून पायी चालत जात असतांना म्हसावद रोडवरील सनी कंपनी समोर एरंडोल कडुन म्हसावद कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या पांढऱ्या रंगाचे वाहनाने माझा नातू पवन याला जोराने ठोस मारुन वाहनावरील चालकाने वाहन भरधाव वेगात म्हसावदच्या दिशेने घेवून गेला. म्हणून आजी व सोबत असलेल्या बायांनी आरडा ओरड केल्याने एरंडोल कडुन उमरदे गावातील संदीप सुकदेव पाटील, योगेश नथ्थु पाटील व एरंडोल येथील माजी नगरसेवक संजय खंडु महाजन हे मोटर सायकलवर येत असल्याने त्यांना थांबवुन घटने बाबत सांगितले. व ते पांढऱ्या बोलेरो वाहनाचा पाठलाग करत म्हसावद कडे जात असलेल्या वाहनांच्या सिनेमा स्टाईल पाठलाग करून बोलेरो वाहन चालक गाडी थांबत नव्हता शेवटी पाठलाग करणाऱ्यानी खडके येथील देवराम विक्रम पाटील यांना फोन करून सांगितले की भरधाव येणाऱ्या बोलेरो वाहनात थांबवा म्हणून देवराम पाटील यांनी आपले ट्रॅक्टर व ट्रॉली यांना रोडावर आडवे उभे केले म्हणून बोलेरो गाडी थांबली. MH-19-BU-6903 क्रमांकाच्या या वाहनास व त्यावरील चालक मनोज मोहन राठोड, वय 22, रा. ढेकु तांडा,ता.अमळनेर यास पकडून सोबत घेवून एरंडोल पोलीस स्टेशन येथे आणले.
दरम्यान ठोस मारल्यामुळे  पवन यास डोक्याला जबर मार लागल्यामुळे व तो हालचाल करत नसल्यामुळे त्याला लागलीच ग्रामीण रुग्णालय एरंडोल येथे उपचारासाठी नेण्यात आले असता तेथे डॉक्टरांनी  पवन यास तपासुन तो मयत झाला असल्याचे सांगितले.
मयत पवन याचे वडील रावसाहेब रोहीदास सोनवणे यांचे मूळ गाव रत्नपिंप्री, ता. पारोळा हे आहे ते कामकाज निमित्ताने उमरदे ता एरंडोल येथे सासरवाडी मध्ये आले आहेत त्यांना पवन हा 7 वर्षाच्या मुलगा व आराध्य ही 4 वर्षाची मुलगी आहे.
याबाबत मयत पवन यांची आजी गंगुबाई सुरेश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एरंडोल पोलीस स्थानकात बोलेरो कंपनीचे MH-19-BU-6903 क्रमांकाचे वाहनास व त्यावरील चालक मनोज मोहन राठोड, वय 22, रा. ढेकु तांडा, ता. अमळनेर यांचे विरुद्ध तक्रार केली असून पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांचे हवालदार संतोष चौधरी पुढील तपास करीत आहे.

close