shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अनाथ व निराधार बालकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून समाधानी- आनंदा चौधरीखडके येथील बालगृहातील मुलासोबत केला वाढदिवस साजरा..!

         प्रतिनिधी/प्रमोद चौधरी

एरंडोल :- शिवसेनेचे युवा नेते संजय गांधी निराधार समितीचे सदस्य व शिवनेरी अध्यक्षआनंद चौधरी(भगत) यांनी आपला वाढदिवस खडके येथीलअनाथ व निराधार  बालगृहात मुला-मुलींना जेवण देऊन अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे तालुकाप्रमुख वासुदेव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,युवा सेनेचे तालुकाप्रमुख बबलू पाटील, शिवसेनेचे शहर प्रमुख व नगरसेवक कुणाल महाजन, युवा सेनेचे शहर प्रमुख अतुल महाजन तेली समाजाचे चे अध्यक्ष गुलाब चौधरी, मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संजय चौधरी, तेली समाज तालुक्याचे सचिव आर डी चौधरी, कुणाल पाटील, अमोल भावसार, मोहन महाजन, राज पाटील, सागर महाजन हे मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात आनंदा चौधरी यांच्या सोबत बालगृहातील लहान बालक लोकेशन निसाळकर या दोघांचे बालगृहातील लहान विद्यार्थिनीने औक्षण केले. व नवीनच या बालगृहात आगमन झालेल्या राज व प्रज्ञा या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आलेल्या मी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी आनंदा चौधरी म्हणाले की मी एक सर्वसाधारण कुटुंबात जन्म घेतलेल्या भक्ती मार्गातील व्यक्ती आहे. समाजातील गोरगरीब यांची सेवा करणे त्यांच्या अडचणींचे निवारण करणे असे कार्य मी करत असतो माझा वाढदिवस हा गृहातील या लहान बालकास सोबत साजरा करताना व त्यांना जेवण खाऊ घालताना या बालकांचा चेहऱ्यावरील आनंद पाहून माझ्या वाढदिवस साजरा झाल्याचे सार्थक झाले असे मला वाटते.
दरम्यान बालगृहातील विद्यार्थ्यांन सोबत आनंदा चौधरी व व मान्यवरांनी जेवण केले. बालगृह अधीक्षक मधुकर कपाटे यांनी सर्वांचे आभार मानले.आज सकाळपासूनच आनंदा चौधरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी तालुक्याचे आमदार चिमणराव पाटील, जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक व पारोळा बाजार समितीचे सभापती अमोल पाटील, पारोळा नगरीच्या माजी नगराध्यक्षा नलिनीताई पाटील, नगराध्यक्ष रमेश परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा मनोज पाटील, समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, किशोर निंबाळकर पंचायत समितीचे माजी सभापती अनिल महाजन,अनिल चौधरी  यांचेसह अनेक मान्यवरांनी सत्कार केला तर भ्रमणध्वनी वरून शुभेच्छांचा वर्षाव केला.

close