shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोल नगरपालिका अंतर्गत दि.१९/१०/२०२१ रोजी प्रभाग क्रमांक ३ व ९ या भागातील रस्तेकॉक्रीटीकरण कामाचे भूमीपूजन..!

           प्रतिनिधी/प्रमोद  चौधरी एरंडोल  :-एरंडोल नगरपालिका अंतर्गत दि.१९/१०/२०२१ रोजी प्रभाग क्रमांक ३ व ९ या भागातील रस्ते कॉक्रीटीकरण कामाचे भूमीपूजन लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री रमेशसिंग परदेशी व भारतीय जनता पक्षाचे जनजाती क्षेत्र प्रमुख श्री.किशोरभाऊ काळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेशसिंग परदेशी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना एरंडोल शहरातील प्रभाग क्र.३ व ९ मधील परिसराचा सर्वागिण विकास करण्याकरिता शासनाकडे भारतीय जनता पक्षाचे संघटन मंत्री श्री किशोरभाऊ काळकर, जळगाव जिल्हाचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री गिरीषभाऊ महाजन यांच्या माध्यमातून निधी मागणी करिता पाठपुरावा केला त्यानुसार निधी मिळाला त्यामुळे आज प्रत्यक्ष कामास सुरुवात होत आहे. त्यामुळे सर्व प्रथम त्यांचे आभार मानून यापुढे देखील शासनाकडून वेळोवेळी निधी उपलब्ध होणार आहे. शहर विकासाकरिता नगरपालिकेतील सर्वपक्षीय सदस्य एकदिलाने काम करीत असल्यामुळे निश्चितच शहराचा कायापालटहोईल यात शंका नाही असे सांगितले.
याप्रसंगी मुख्याधिकारी श्री विकास नवाळे, उपनगराध्यक्ष सी.आरती महाजन,सन्मा.नगरसेविका सौ.सरलाताई पाटील,सन्मा.नगरसेवक असलम पिंजारी, श्री.नितिन महाजन,नगरसेवक श्री. अभिजित पाटील, श्री.योगेश महाजन,श्री.कृणाल महाजन,जहीरोदीन कासम,श्री.अभिजित पाटील, श्री.नितिन चौधरी,प्रमोद महाजन,अतुल महाजन नगरपालिकेचे कार्यालय अधिक्षक श्री.हितेश जोगी,सहा.प्रकल्प अधिकारी श्री महेंद्र पाटील,श्री.आनंद दाभाडे तसेच प्रभाग क्र.३ व ९ या परिसरातील मोठया प्रमाणात नागरीक उपस्थित होते.
close