प्रतिनिधी/प्रमोद चौधरी
एरंडोल:- येथील दि. शं .पाटील महाविद्यालयात आज दिनांक 19 आक्टो 21 रोजी एनसीसी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष दादासो अमित पाटील हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अमळनेर बटालियन चे कमांडिंग ऑफिसर कर्नल विवेक भटारा व बटालियन चे प्रशासकीय अधिकारी समीर बोडस ,महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्राध्यापक एन. ए .पाटील सर हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते .या सात दिवसीय शिबिरात विद्यार्थ्यांना रक्त दान ,डिझास्टर मॅनेजमेंट, समाजसेवा , एन.सी.सी चे महत्व व योगदान, ड्रिल , शस्त्र प्रशिक्षण , राष्ट्रीय एकात्मता यासंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे .या कार्यक्रमाच्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष दादासो अमित पाटील यांनी एनसीसी मुळे देश कार्य आणि समाज कार्य करण्यास प्रोत्साहन मिळते म्हणून विद्यार्थ्यांनी या कार्यात जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवला पाहिजे ,आज युवकांना एनसीसी सारख्या योजनेच्या माध्यमातून एक दिशा मिळण्याची गरज आहे. आजच्या युवकाने काय योग्य, अयोग्य या गोष्टींचा विचार करून मार्गक्रमण केले पाहिजे या गोष्टी आपणास एनसीसी च्या मंचावर शिकण्यास मिळतील त्यामुळे एन सी सी मध्ये आपण सक्रिय सहभाग घेतला पाहिजे असे आपल्या मनोगत व्यक्त केले तर कमांडिंग ऑफिसर यांनी एनसीसी आणि आजचा युवक या विषयी बोलताना एनसीसी च्या विद्यार्थ्यांना किती संधी आहे. याविषयी भाष्य केले, देशसेवेसोबत आदर्श व शिस्तप्रिय नागरीक घडतो , आर्मीत नोकरीचे एनसीसीच्या विद्यार्थ्याना विविध संधी असल्याबाबत ले कर्नल बोडस यांनी मार्गदर्शन केले . यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी एनसीसी शिबिराला शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला प्राध्यापक के.जे.वाघ, प्राध्यापक सोपान साळुंखे . प्राध्यापक सुरज वसावे ,सुभेदार नरेंद्र तायडे ,हवालदार अरुण बेलसरे, हवालदार शिकरवार ,रा .ति. काबरे विद्यालयाचे एएनओ अमोल वाणी, प्राध्यापक चिमकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले .तर प्राध्यापक सचिन पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले याप्रसंगी एन सी सी चे विद्यार्थी उपस्थित होते

