प्रतिनिधी/प्रमोद चौधरी
एरंडोल:-सुखकर्ता फाउंडेशन एरंडोल आणि केशवस्मृती संस्था व सेवा समूह जळगाव ह्यांच्या तर्फे दिनांक १७ ऑक्टो. रोजी एरंडोल येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरात आयोजित मोफत हिमोग्लोबिन तपासणी व थॅलेसिमिया जनजागृती शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला .
जळगाव येथील केशवस्मृती सेवा संस्था समूहाच्या थॅलेसिमिया मुक्त मिशन च्या प्रकल्प प्रमुख डॉ .सई नेमाडे ( एम . डी . शरीरविकृतीशास्त्र )व प्रकल्प समनव्यक श्री . भानुदास येवलेकर ह्यांच्या टीम ने १२०नागरिकांचे एच.बी .इलेक्ट्रोफेरेसिस ह्या रक्त चाचणीसाठी सँपल घेतले .
विशेष म्हणजे लहान बालकांपासून ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक , किशोरवयीन युवती व युवक ह्यांनी उत्साहाने हि चाचणी करून घेतली .
सद्यस्थितीत थॅलेसिमिया ह्या रक्त विकाराचे ५ लाख रुग्ण भारतात आहेत व ५ कोटी नागरिक हे थॅलेसिमियाचे वाहक आहेत अर्थात त्यांना कुठलाही त्रास होत नसल्यामुळे हि चाचणी केल्यानंतरच त्यांच्या पुढील पिढीमध्ये येऊ शकणारा हा अनुवांशिक असा रक्तविकार आपण रोखु शकतो म्हणून ह्याबाबत जागरूकता आणणे महत्वाचे आहे . व त्यासाठी असे शिबीर आयोजित करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ . सई नेमाडे ह्यांनी केले . तर सुखकर्ता फाउंडेशनच्या अध्यक्ष व माजी उपनगराध्यक्षा डॉ . गीतांजली ठाकूर ह्यांनी युवक युवतींनी विवाहपूर्व ग्रह तारे , मंगळ ह्यांच्या कुंडलीच्या अभ्यासाऐवजी आरोग्यकुंडली चा आग्रह धरला पाहिजे व त्यासाठी ग्रामीण भागात ह्याविषयी जनजागृती करणे आवश्यक असल्यामुळे सुखकर्ता फाउंडेशन तर्फे हे शिबीर आयोजित केल्याचे मत व्यक्त केले . त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील किशोरवयीन युवती व महिला ह्यांच्या मध्ये रक्तक्षयाचे प्रमाण हि मोठया प्रमाणात असल्यामुळे ह्या वर्गासाठी थॅलेसिमिया ह्या आजाराबरोबरच रक्तक्षयाचे निदान ह्या चाचणीच्या माध्यमातून होत असल्यामुळे समाधान व्यक्त केले .
ह्या थॅलेसिमिया रक्तचाचणी शिबीर आयोजनाकामी दक्षिणमुखी हनुमान मंदिर ट्रस्ट चे पदाधिकारी श्री .युवराज पाटील , श्री . विक्रम चोधरी , श्री . राजू चोधरी , नाना महाजन , माउली क्लासेस चे गोरख महाजन सर , युवा कार्यकर्ते प्रवीण चोधरी , सागर चोधरी , राहुल चोधरी , नितीन पाटील , पवन चोधरी
, रोहित मराठे. विक्की मराठे , कैलास चोधरी , अजय मराठे ,बाळा धनगर , गोरख चोधरी व इतरांनी आणि सुखकर्ता फाउंडेशन चे शेखर बुंदेले , सागर ठाकूर ह्यांनी परिश्रम घेतले .
नगरसेवक डॉ . नरेंद्र ठाकूर ह्यांनी उपस्थितांचे आभार मानले .

