shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोलला जागर स्त्रीशक्तीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न..!

          प्रतिनिधी/प्रमोद चौधरी
नवरात्रोत्सवानिमित्तानेराजमाता जिजाऊ महिला मंडळ , जिजाऊ  ब्रिगेडतर्फे भूलाबाई महोत्सव , महान नायिकांच्या वेषभूषा ..
एरंडोल - नवरात्रोत्सवानिमित्ताने राजमाता जिजाऊ महिला मंडळ आणि जिजाऊ ब्रिगेडतर्फे जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रम उत्साह आणि आनंदाच्या वातावरणात एरंडोलमधील हिंगलाज कॉलनीत साजरा करण्यात आला . यावेळी भूलाबाई महोत्सव , विविध नायिकांच्या वेषभूषा , महान कार्याची माहिती देण्यात येवून त्यांचे सदैव स्मरण ठेवावे असे आवाहन करण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेविका शशिकला जगताप होत्या . कार्यक्रमाची सुरूवात जिजाऊ पुजन आणि जिजाऊ वंदनाने करण्यात आली . जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश सदस्या तथा राजमाता जिजाऊ महिला मंडळ अध्यक्षा शकुंतला अहिरराव यांनी भोंडला कार्यक्रमाची महती सांगितली . जागर स्त्री शक्तीच्या कार्यक्रमात जिजाऊ माँसाहेब , महाराणी ताराराणी येसूबाई , सावित्रीबाई फुले , अहिल्याबाई होळकर , झलकारी , रमाबाई तानुबाई बिर्जे या महान नायिकांची वेषभूषा , महान कार्याबाबत माहिती दिली . , जागर स्त्री शक्तीच्या कार्यक्रमात भूलाबाई महोत्सव देखील साजरा करण्यात आला . महिलांनी विशेष वेषभूषा करून गाणी , फुगडी सादर करून आनंद लुटला . मंडळ सचिव वंदना पाटील यांच्या सूनबाई मधुरा आशिष पाटील यांनी काढलेल्या रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधले . जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा मनिषा पाटील यांनी अंधश्रध्दा निर्मूलनासाठी महिलांनी अन्याय , अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी स्वरचित गीत सादर केले . सुरेखा पाटील यांनी शिवरायांवरील दामेंडा सादर केला . पारंपारिक पध्दतीने भूलाबाईचा खाऊ जिंकून बक्षिसे वाटप करण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षा जगताप ताई यांनी महिलांनी ऐतिहासिक वारसा जपून कायम स्मरण करण्याचे महिलांना आवाहन केले . सूत्रसंचलन जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा मनिषा पाटील यांनी तर सचिव वंदना पाटील यांनी आभार मानले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी रजनी काळे , सुरेखा पाटील , शकुंतला पाटील , सुलोचना पाटील , गायत्री पाटील , लता पाटील , राधा पाटील , अन्नपूर्णा पाटील , वसुधा कुळकर्णी , मधुरा पाटील आदींनी परिश्रम घेतले .
close