shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

व्यसनाधीन मुलाचा बापानेच केला डोक्यात लोखंडी घन घालून खून..!!

 

: आरोपीला चार दिवसाची पोलीस कोठडी

----------------------------------------------------
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :- 
केज तालुक्यातील दैठणा येथील विलास चंद्रकांत मुळे याचा खून त्याच्या वडीलानेच केल्याचे निष्पन्न झाले असून मयत विलास मुळे याच्या आईच्या फिर्यादी वरून खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या बाबतची माहिती अशी की, दैठणा ता केज येथील विलास चंद्रकांत मुले वय ३८ वर्ष या तरुणांचा मृतदेह गावातील समधनभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला आढळून आला होता परंतु यो खून कोणी व का केला असावा ? हे काहीच समजून येत नव्हते. त्याच्या घरचे लोकही कोणी काहीच बोलत नव्हते.

मात्र पोलिसांनी गावात अधिक चौकशी करता असे समजले की, विलास हा काही कामधंदा करीत नव्हता. तो रात्र अन दिवस नशेच्या अंमलाखाली असे. घरातील आई-वडील व पत्नीला त्रास देत असे. त्याच्या या वर्तणुकीला सर्वजण कंटाळले होते. घरी दारू पिण्यासाठी पैसे मागत असे तसेच आई वडिलांकडे पैशाची मागणी करून कुऱ्हाडीने जिवे मारण्याची धमकी देत होता. घरातील वस्तू देखील विकत असे.


दरम्यान विलास दि.२० ऑक्टोबर बुधवार रोजी तो सायं ७:३० वा घरी जेवण करून दारू पिला. त्याची आई गयाबाई मुळे ही कोजागरी पौर्णिमेच्या कार्यक्रमाला गावात गेली होती. तिला एकाने रात्री १२:३० वा स्मशान भूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला घाणीत दारू पिऊल लोळत असल्याची माहिती त्याची आई गयाबाई हिला दिली. तिने ही माहिती विलासचे वडील चंद्रकांत मुळें वय (६५ वर्ष) यांना सांगितली. त्यामुळे चंद्रकांत मुळे यांच्या रागाचा पारा चढला त्यांनी घरातील लोखंडी घन घेऊन ते त्याच्याकडे गेले आणि रागाच्या भरात तो लोखंडी घन त्यांनी मुलगा विलास याच्या डोक्यात हाणला. तो घणाचा घाव वर्मी बसताच डोके फुटून विलासचा जागीच मृत्यू झाला. त्या नंतर चंद्रकांत मुळे हे घरी आले. अंगावरील रक्ताने माखलेले अंगावरील धोतर काढून ते धुण्यासाठी टाकले. दुसरे कपडे घालून झोपी गेले. त्या नंतर गावात विलास मुळे याचा मृत्यू हा अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी केला असल्याची माहिती पसरली त्या नंतर पोलीसांनी घटनास्थळी दाखल झाले. तसेच तपास करण्यासाठी श्वान पथकलाही पाचारण करण्यात आले होते.


दरम्यान मयत विलास मुळे यांची आई सौ. गयाबाई चंद्रकांत मुळे हिच्या फिर्यादी वरून तिच्या नवरा चंद्रकांत मुळे याच्या विरुद्ध गु र नं ५२०/२०२१ भा.दं.वि. ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या खुनाचा उलगडा करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, पोलीस निरीक्षक दादासाहेब सिद्धे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कादरी, पोलीस जमादार शिवाजी शिनगारे, अशोक नामदास, अनिल मंदे, दिलीप गित्ते, जसवंत शेप, शेख, शेषेराव यादव, हुंबे यांनी प्रयत्न केले.


सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे हे पुढील तपास करीत आहेत.

दि. २१ रोजी आरोपीला न्यायालया समोर हजर केले असता दि. २४ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


बापच निघाला मुलाचा मारेकरी ! :- मयत विशाल हा दारू पिण्याच्या सवयीचा होता व तो घरात नेहमी आई वडील आणि नातेवाईका सोबत भांडण करीत असे म्हणून त्याचा बाप चंद्रकांत उद्धव मुळे याने वैतागून डोक्यात घन मारल्याने वर्मी घाव बसल्याने विलास याचा मृत्यू झाला.


पोलिसांचा संशय खरा निघाला ! :-

या खुनाचा तपास करताना पोलीस अधिकाऱ्यांना काहीच पुरावा सापडत नव्हता पण चाणाक्ष पोलीस अधिकाऱ्यांच्या हे लक्षात आले की, विलासच्या मृत्यू बाबत त्याच्या कुटुंबातील सदस्य कुणी काहीच बोलत नव्हते. त्याचे वडिलांच्या चेहऱ्यावर मुलगा मयत झाल्याचे दुःख दिसत नव्हते आणि पोलीस प्रेताचा पंचनामा करीत असताना चंद्रकांत मुळे यांनी हॉटेल मध्ये जाऊन नाष्टा केला. नेमकी हीच गोष्ट पोलीस अधिकाऱ्यांना खटकली आणि त्यांनी कुठलाही संशय न येऊ देता अंत्यविधी आटोपताच त्याला ताब्यात घेतले. त्या नंतर प्रश्नांची सरबत्ती करताच त्याने खुनाची कबुली दिली.
close