shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुलगा शेतात का गेला म्हणून भांडण करून दोन भावांनी केला २५ वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग..!!

----------------------------------------------------
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी  :-
तुझा मुलगा आमच्या शेतात का आला ? असे म्हणून दोन भावांनी एका २५ वर्षीय महिलेशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केल्याची घटना केज तालुक्यात घडली आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. २० ऑक्टोबर रोजी दुपारी २:०० वा च्या सुमारास केज तालुक्यातील आंधळेवाडी येथे भिमराव साहेबराव आंधळे व दत्ता साहेबराव आंधळे यांनी एका २५ वर्षीय विवाहित महिलेस तुझा मुलगा आमच्या शेतात का आला असे म्हणून भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच वाईट हेतूने गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी महिलेच्या पतीने त्यांना जाब विचारला असता शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी पिडीत महिलेच्या।फिर्यादी वरून भिमराव साहेबराव आंधळे व दत्ता साहेबराव आंधळे यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
close