शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा राहुरी तालुका प्रतिनिधी दिपक हरिश्चंद्रे
राहुरी,दि.११ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) – उत्तरप्रदेशच्या लखीमपूर खीरी येथे शेतकऱ्यांच्या झालेल्या हत्येच्या निषेधार्थ व केंद्रीय ग्रुहराज्यमंत्र्याच्या राजीनाम्यासाठी आज महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला राहुरी शहरासह तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील प्रमुख शहरात कडेकोट बंद पाळण्यात आला. ग्रामीण भागात मात्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
राहुरीसह देवळाली प्रवरा, टाकळीमिया, सात्रळ, वांबोरी, कोल्हार खुर्द गावासह शहरातील व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी होऊन पाठिंबा दर्शविला. वांबोरी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती प्रवेशद्वाराजवळ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना व मित्रपक्षांसह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत केंद्र व उत्तरप्रदेश सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत निषेध रॅली काढण्यात आली. केंद्र व उत्तर प्रदेश सरकारच्या नाकर्तेपणाचा पाढा यावेळी वाचण्यात आला. प्रसंगी प्रहार संघटनेचे प्रल्हाद शिंदे यांनी आपल्या भाषणात केंद्रसरकारवर घणाघाती हल्ला चढविला. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब आढाव, शिवसेनेचे बाळासाहेब गाडे यांनी केंद्र सरकारवर शेतकऱ्यांच्या होत असलेल्या अन्यायकारक घटनांचा निषेध केला
यावेळी राहुरीचे नगराध्यक्ष अनिल कासार, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस सुरेश निमसे, पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र आढाव, सदस्य बाळासाहेब लटके, नगरसेवक नंदकुमार तनपुरे, प्रकाश भुजाडी, युवा सेनेचे गणेश खेवरे, सुरेश म्हसे, माजी संचालक बाळासाहेब गाडे, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष महेश उदावंत, युवक शहराध्यक्ष संतोष आघाव यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
@वांबोरी: येथीलअत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद होते. येथे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, किसन जवरे, माजी सरपंच नितीन बाफना, प्रशांत नवले, बंटी वेताळ, विशाल पारख,कुलदीप पाटिल, नीलेश नेटके, सूरज वाघ, राहुल पटारे,विठ्ठल बोरकर,संतोष पटारे, शैलेश पागिरे, गोटिराम मोरे,श साळुंके,अशोक पटारे, यांनीही निषेध रॅली काढून घटनेचा निषेध केला.
तेथील व्यापाऱ्यांनीही व्यवहार बंद ठेवत पाठिंबा दिला. राहुरी शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पारख यांनी पत्रक काढून व्यापाऱ्यांना बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. कोल्हार खुर्द येथेही सकाळपासून सर्व व्यवहार बंद ठेवत बंदला पाठिंबा दिला. देवळाली प्रवरेतही तीनही पक्षांचे नेते व कार्यकर्त्यांनी एकत्र येत केंद्रशासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करत घोषणा दिल्या. बाजारपेठेत शुकशुकाट दिसला तळ ठीकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (राहुरी- तालुका प्रतिनिधी )📲7350591600

