✡️ भटके विमुक्त जमाती ला छोटेसे आरक्षण आहे ,ते ही शिक्षण, नोकरीत व नोकरीत प्रमोशन यात राजकीय आरक्षण तर नाहीच, तरी ही काढण्यासाठी राजकीय पक्ष हिम्मत करीत आहे का? जे लोकं शिक्षण घेऊन VIJNT च्या आरक्षणावर नोकरी मिळवली, प्रमोशन घेतले, आज तेच आरक्षण असंविधानिक आहे असे सरकार कोर्टात सांगते, तसे लेखी ही देते. मात्र हे कर्मचारी कोठे आहेत, हे कोणाची वाट पाहत आहे.
उदया होणारे प्रमोशन थांबणार किंवा दिलेले प्रमोशन काढून घेणार हे सर्व काही या केस नंतर होऊ शकते, जे कोर्टात जातात त्यांच्या पाठीशी ही हे उभे नाही, जे मोर्चा काढते त्यांच्या पाठशी हे उभे नाही,, आहो हे माहीत होतांच कामबंद आंदोलन किंवा मोर्चा काढण्याची भाषा ही हे कर्मचारी अजून करीत नाही का? एवढी भीती का? साप चावल्या सारखी शांतता आहे, धनगर, बंजारा, वंजारी, वडार, भोई, बेलदार या सारखे मोठे समाज चक्क चुपचाप आहे, मग लहान भटक्याविमुक्त मधील अल्पसंख्याक ज्या जाती आहे त्यांनी काय करावे ? आश्चर्यकारक हे आहे की यांचे नेते ही मुंग गिळून चूप आहेे. पक्षाच्या आदेशाची वाट पाहत, हे तर अर्ध चित्र आहे जर सरकार यात यशस्वी झाले तर लक्षात घ्या पुढे भटक्या विमुक्त जमातीचे संपूर्ण आरक्षण जायला वेळ लागणार नाही?📛
🏛️२००४ ला हा प्रमोशन इन आरक्षण कायदा येतो आणि तेव्हाच त्याला कोर्टात खिचल्या जातो तरी आमच्या कर्मचारी बांधवांच्या लक्षात का येत नाही. ही कानुनी लढाई आहे तेवढीच रस्त्यावरची ही आहे ज्याला तन, मन, धन लागतो त्याशिवाय कोणत्याच संघटना काहीच करू शकत नाही ,कर्मचारी वर्ग आरक्षण इन प्रमोशन जाण्याच्या उंबरठ्यावर उभे आहेत तरीही आवाज मात्र येत नाही हेच आश्चर्य आहे .🟪
✍️ उदया मिळालेलं प्रमोशन वापीस गेले किंवा पुढचे प्रमोशन मिळालंच नाही तरी आम्ही हीच बघ्याची भूमिका घेणार का?📌
🫀मन जिवंत असेल अथवा VJNT बद्दल कळवळ असेल, समाजाबद्दल खरंच चिंता असेल, आपल्या मुलांचा विकास व्हावा याची खरंच जाणीव असेल तर उठा निषेध नोंदवा आणि संघटने च्या पाठीशी उभे रहा ते ही नसेल जमत तर मग गोधडी घ्या आणि निवांत झोपा, मात्र हे लक्षात घ्या आपल्या लोकांनी मिळवून दिलेले आरक्षण आहे , माहिती आहे तुम्हाला हे मिळवण्यासाठी मेहनत करावी नाही लागली मात्र ज्यांनी हे आरक्षण दिले ,किंवा ज्यांनी या साठी लढा दिला त्यांची प्रेरणा लक्षात घेऊन उभे व्हा आणि भटके विमुक्त खरंच स्वतंत्र सैनांनी होते हे दाखवून द्या ,,,नाही तर मागे सांगिल्या प्रमाणे गुलाम व्हा व आपल्या पक्षाचा आदेश येत पर्यंत झोपा काढा.☠️😷
सत्य हे कटू असते, पण नाविलाज आहे.
होय आम्ही जागे असलेले भटके विमुक्त आहोत.

