shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिवसंग्राम केज नगर पंचायतीच्या मैदानात उतरायची जोरदार तयारी केशव कदम व प्रकाश गुंड यांनी लावली जोरदार फिल्डिंग..!!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-

केज नगर पंचायत ची निवडणूक लवकरच लागण्याची शक्यता असल्यामुळे व शिवसंग्राम नी नगर पंचायत मधे लढण्याची जोरदार तयारी चालू केली आहे . केशव कदम व प्रकाश गुंड यांनी शहरातील सर्व प्रभागात निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार देणे तसेच शहरातील एक चांगले नेतृत्व शिवसंग्रामच्या माध्यमातून शहराच्या निवडणूकीत उतरण्याची शक्यता असल्याचे सुध्दा समजते . त्यामुळेच केज शहराच्या निवडणूकीत आ. विनायक मेटे यांनी जोरदार तयारी करत असल्याचे चित्र निर्माण झाले असुन सरळ सरळ वाटणारी लढत आता रंगतदार होण्याची शक्यता आहे . 


महाराष्ट्राच्या राजकारणात केज तालुक्याच्या भुमीतून राज्याचे नेतृत्व करणारे आ. विनायक मेटे यांनी आतापर्यत केजकडे विशेष लक्ष दिले नव्हते परंतु या निवडणूकीच्या माध्यमातून पहिल्यांदाच शिवसंग्राम आपली ताकद दाखवणार आहे . आ. विनायक मेटे यांना माणनारा मतदार केज शहरात आहे तसेच शिवसंग्राम चे पदाधिकारी पण शहरात आहेत परंतु अद्याप पर्यंत कधीही निवडणूक लढण्याचा विचार केलेला नव्हता . नुकताच माजी शिवसेना तालुका प्रमुख केशव कदम व भाजप चे केज शहर अध्यक्ष प्रकाश गुंड यांनी शिवसंग्राम मधे प्रवेश केला तेव्हा पासून शहरात शिवसंग्राम निवडणूक लढणार अशी शक्यता वाटत होती. 

सध्या केशव कदम व प्रकाश गुंड या दोघानी शहरातील सर्व भागात जाऊन समस्या जाणून घेऊन आपल्या संबधातील सर्वाना निवडणूक लढणार व शिवसंग्रामचा स्वतंत्र पॕनल टाकून ताकतीने लढणार असल्याचे सांगितले असल्याचे समजते . तसेच नगर पंचायत लढण्याचे व संपूर्ण प्रभागात ताकतवार उमेदवार देणार असल्याचे समजत आहे . शहरातील जुने व नव्याचे समीकरण जुळत असल्याचे समजत असून एक चांगले नेतृत्व शिवसंग्रामच्या माध्यमातून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणार असल्याचे पण समजत आहे . 

शहरातील सर्व प्रभागावर पकड असणाऱ्या या नेत्याचा मुलगा व जुने मातब्बर राजकारणी व विविध पदावर राहिलेले मोठे व्यक्तीमत्व असुन त्यांचा जुन्या राजकारणात मोठा प्रभाव होता परंतु काही काळापासून राजकारणापासून दुर होते परंतु शहराचे नेतृत्व करायला मिळत असल्यास ते मैदानात उतरु शकतात अस समजत आहे , असे झाल्यास शिवसंग्रामचा केज धारुर सह अंबाजोगाई तिनही तालुक्यात याचा प्रभाव पडू शकतो व मुळात केज तालुक्याच्या मातीतील नेतृत्व आ. विनायक मेटे यांनी संपूर्ण राज्याचे नेतृत्व केले परंतु केज मधे कधीही लक्ष घातले नव्हते ते या निवडणूकीच्या माध्यमातून आता पुर्ण होण्याची शक्यता आहे व जुन्या नव्या नेतृत्वाचे समीकरण जुळल्यास शिवसंग्रामची ताकत निश्चितच वाढेल यात शंका नाही.

सध्यातरी केज च्या निवडणूक मैदानात शिवसंग्राम आपली पुर्ण क्षमता लावणार असल्याचे चित्र असून आ. विनायक मेटेची पहिली बैठक झाली असून कार्यकर्त्यांना बीडला बोलावून घेऊन कानमंत्र देणार असल्याचे समजते व संपूर्ण ताकतीदीने मैदानात उतरा मी पाठीशी आहे असे सांगितले  आहे.
close