शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार,२९ ऑक्टोबर , २०२१
पुणे : बारामती पाटस महामार्गावर उंडवडी कडेपठार येथे दारुच्या बॉक्सने भरलेला ट्रक पलटी झाला आहे. ट्रक ड्राईव्हरचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास पलटी झाला. पलटी झालेल्या ट्रकमध्ये 65 लाख रुपये किमतीचे 950 बॉक्स भरले होते. असं ट्रक ड्राईव्हर निलेश गोसावी आणि किनर अंकुश बेंद्रे (रा. बारामती) यांनी सांगितलं आहे. या झालेल्या अपघातामध्ये कोणतेही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, तेथील स्थानिकांनी दारुचे बाॅक्स पळवले आहेत.
याबाबत माहिती अशी की, बारामती तालुक्यातील पिंपळी कंपनीचा दारुने भरलेला ट्रक घेऊन जळगांव येथे निघाला होता. पहाटे 4.30 च्या सुमारास चालकाला झोप लागल्याने ट्रक उंडवडी कप येथील पवार ढाब्यासमोर पलटी झाला. दारूचा ट्रक पलटी झाल्याची घटना परिसरात पसरली. नंतर येथील नागरिकांनी पिशव्या भरुन दारुच्या बाटल्या भरुन पळून नेल्या. यात महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. पण, ड्रायव्हर व क्लिनर यांना कोणीही गाडीतून बाहेर काढण्यासाठी मदत केली नाही. सकाळ पर्यंत लोकांनी दारु पळवण्यावर सपाटा लावला. याबाबत माहिती समजताच बारामती ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. इतक्यात लोकांनी दारुच्या बाटल्या सोडून पसार झाले.
दरम्यान, गाडी चालक निलेश गोसावी आणि किनर अंकुश बेंद्रे यांनी लोकांनी दारु घेऊन जाऊ नये. असं म्हटल्यावर चालकाला मारहाण केली गेली. आणि लोकांनी गाडीची ताडपत्री हत्याराने फाडून पोतीच्या पोती दारु घेऊन गेले.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

