shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात; १ जण जागीच ठार तर दोन जण अपघातामध्ये गंभीर जखमी..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार,२९ ऑक्टोबर , २०२१

आळेफाटा : नगर - कल्याण महामार्गावर आळे गावच्या हद्दीत असलेल्या लवनवाडी परिसरात आयशर टेम्पो व पिक अप जीपची समोरामोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये पिक अप चालक ठार झाला. ही घटना गुरूवारी (दि २८) रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास घडली.

       याबाबत आळेफाटा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की नगरकडून कल्याण बाजूला जाणारा आयशर टेम्पो ( क्रमांक एम एच ४२ ए क्यू ३६३६) व कल्याणबाजूकडून नगरच्या दिशेने जाणारी पिकअप जीप (क्रमांक एम एच १४ डी एम ८९११) यांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला या अपघातामध्ये पिक अप चालक राजकुमार गोपीनाथ हाडवळे ( वय ४२ वर्ष रा.राजुरी,ता जुन्नर जि. पुणे) यांचा म्रुत्यू झाला आहे. तर पिक अप जीपमधील कैवल्य प्रकाश औटी ( वय १५ वर्ष राहणार राजुरी, ता. जुन्नर ,जि पुणे) आणि आयशर टेम्पोमधील ऋषिकेश अनंता पायगुडे राहणार ( केडगाव चौफुला ता.दौंड जि पुणे) हे दोघे या अपघातामध्ये जखमी झाले असून जखमींवर आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची फिर्याद हरिश्चंद्र कोकाटे (रा. पिंपळवंडी,ता जुन्नर,जि पुणे) यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात दिली असून या फिर्यादीवरुन आयशर टेम्पोचालकावर आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close