प्रतिनिधी : संजय वायकर
जेऊर (बा . ) : २२ / नगर तालुक्यातील बायजाबाई जेऊर येथील ग्रामपंचायत ने येथील कामाच्या जाहीर निविदा काढल्या आहेत . परंतु त्यातील काही कामे अगोदरच पूर्ण झालेली आहेत . ग्रामपंचायत च्या या अजब कारभाराची योग्य ती चौकशी व्हावी यासाठी युवाशक्ती ग्रामविकास संगठनचे जिल्हाध्यक्ष श्री. दादासाहेब विधाते यांनी या बाबत संबंधीत प्रशासनाला निवेदन दिले आहे . यावेळी बा .जेऊरचे सामाजिक कार्यकर्ते श्री .शामराव विधाते उपस्थित होते .
दादासाहेब विधाते यांनी सांगितले की , जाहिर निविदा काढलेल्या नोटिस मध्ये अ. नं. १ वरील अनिल पवार ते कमानीर्यंत अंतर्गत रस्ते खडीकरण करणे व अ.नं. ६ राम मंदिर ते अगिल पवार घर येथे आर.सी.सी. गटार करणे हे कामे आधीच झालेले आहे. तरी निविदा नोटीस मध्ये १२/१०/२०२१ ते १९/१०/२०२१ पर्यंत या कामासाठी ठेकेदारांना टेंडर भरण्यास मुदत दिलेली आहे. परंतु ते कामे आधीच पुर्ण झालेली आहेत. ही कामे नियमबाह्य कामे करून नंतर निविदा नोटिस काढली आहे. निवेदनासोबत त्या झालेल्या कामाचे फोटो व वर्तमान पत्रातील निविदा नोटीसची प्रत जोडलेली आहे. तरी संबंधीत प्रशासनाने सदर कामाची योग्य ती चौकशी करून दोषींवर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी निवेदना द्वारे करण्यात आल्याचे सांगितले .
सदर निवेदन मा .जिल्हाधिकारी ,
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद , तसेच मा. गटविकास अधिकारी अहमदनगर यांना देण्यात आले आहे .
यावेळी युवा शक्ती ग्रामविकास संगठनचे उपाध्यक्ष श्री .जावेद शेख तसेच सचिव श्री .सुनिल काळे उपस्थित होते .

