shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्काराने हादगाव येथील अनुसया वायबसे सन्मानित..!!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी  :-                       

महिला व बालविकास विभाग जि.प.बीड यांच्या वतीने आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार प्रदान  सोहळा मंगळवार दि.१२ आँक्टोबर २०२१ रोजी जि.प.बीड येथे आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कारासाठी केज तालुक्यातील हादगाव येथील अनुसया वायबसे यांची निवड करून त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या हस्ते व उपमुख्यकार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकाण, जि.प.अध्यक्षा - शिवकन्याताई सिरसाट, महिला व बालकल्याण सभापती - यशोदाताई बाबुराव जाधव, बालविकास प्रकल्प अधिकारी - उमा कांडे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.       






                       

आंबेडकर भवन बीड येथे जिल्हा परिषद बीड महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने उत्कृष्ट काम करणाऱ्या बालविकास प्रकल्प अधिकारी पर्यवेक्षका अंगणवाडी कार्यकर्ती यांना ट्राॅपी प्रशस्तीपत्र शाल श्रीफळ देवुन केज प्रकल्पातील उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी ताई श्रीमती अनुसया वायबसे हादगाव यांना आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.                              


आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार मिळाल्याबद्दल हादगाव येथील अनुसया वायबसे यांचे अनेकांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

close