!
प्रतिनिधी । स्नेहा उत्तम मडावी :
पुणे :- सदर अल्बम साॅंग "नयनी तुझ्या ओलावा" हे गाणं तरुण पीडीसाठी वेड लावणारे असे आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अल्बम सोंग "नयनी तुझ्या ओलावा" रिलीज होणार आहे. हे गाणं ऐकून नक्की आपल्या सगळ्यांना समाधान मिळेल. याची मला खात्री आहे. प्राजक्ता फिल्म प्रोडक्शन प्रोडूसर रेखा सुरेंद्र जगताप यांची मुलाखतही घेतली आहे.
प्रसिद्धी गायिका आर्या आंबेकर यांनी सुंदर आवाजामध्ये रेकॉर्डिंग केले आहे. पेन या ठिकाणी हे छानसे गाणे रेकॉर्डिंग करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत अनुराग गोडबोले यांनी सुद्धा या गाण्यासाठी आपला गोड आवाज दिला आहे.गीतकार व संगीतकार सुनील म्हात्रे, अविनाश पाटील हे आहेत.
प्राजक्ता फिल्म प्रोडक्शन प्रोडूसर रेखा सुरेंद्र जगताप, मराठी गाण्याचे अल्बम डिरेक्टर कैलास काशिनाथ पवार आहेत. या गाण्याचे चित्रीकरण 16 ऑक्टोबर 2021रोजी मुंबई या ठिकाणी चित्रीकरण होत आहे.
Pfp म्युझिक चैनल वरती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला हा मराठी अल्बम येणार आहे.

