shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात हर्षवर्धन पाटील यांना आले यश.२१ जागांसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पॅनेलचेच २१ अर्ज राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. अधिकृत घोषणा ही २२ ऑक्टोबर रोजी होणार.

कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात हर्षवर्धन पाटील यांना आले यश.

२१ जागांसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पॅनेलचेच २१ अर्ज राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.
 
अधिकृत घोषणा ही २२ ऑक्टोबर रोजी होणार.
इंदापूर  : इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात  माजी मंत्री हर्षवर्धन पाटील  यांना यश आले आहे . अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २१ जागांसाठी २१ अर्ज राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. हर्षवर्धन पाटील यांनी कोरोना काळाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन  सर्वपक्षीयांना केले होते. त्या   आवाहनाला सर्वांनी प्रतिसाद देत ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी हातभार लावला. 

 या निवडणुकीत २१ जागांसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पॅनेलचेच २१ अर्ज राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली असली तरी निवडणूक कार्यक्रमानुसार याची अधिकृत घोषणा ही २२ ऑक्टोबर रोजी होणार आहे. 
ही निवडणूक बिनविरोध करून हर्षवर्धन पाटील यांनी आपले राजकीय वर्चस्व अबाधित राखले असून येणाऱ्या काळात कारखाना राज्यातील पहिल्या दहा कारखान्यांमध्ये कसा येईल यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहे. यासाठी या नवीन संचालक मंडळाची त्यांना समर्थ साथ राहील अशी सभासदांना आशा आहे.

कर्मयोगी कारखान्याचे
बिनविरोध झालेले गटनिहाय
 संचालक पुढील प्रमाणे : इंदापूर गट- भरत शहा, शांतीलाल शिंदे, रवींद्र सरडे. कालठण गट- हर्षवर्धन पाटील, हनुमंत जाधव, छगन भोंगळे. शेळगाव गट- बाळासाहेब पाटील, राहुल जाधव, अंबादास शिंगाडे. भिगवण गट- पराग जाधव, विश्वास देवकाते, निवृत्ती गायकवाड. पळसदेव गट- भूषण काळे, प्रवीण देवकर, रतन देवकर. महिला राखीव-शारदा कुबेर पवार, कांचन अशोक कदम. अनुसूचित जाती जमाती- केशव दुर्गे. इतर मागास प्रवर्ग- सतीश व्यवहारे. भटक्या विमुक्त जाती प्रवर्ग- हिरा पारेकर. ब वर्ग प्रतिनिधी- वसंत मोहोळकर.
close