shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहाता तालुका तलाठी आणि मंडळ अधिकारी यांचा संगणकीय कामकाजावर बहिष्कार..!

राहाता ।  प्रतिनिधी :-
राहाता तालुका तलाठी संघाने महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या निर्देशावरून आंदोलनाचा तिसरा टप्पा म्हणून आज तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या डिजिटल सही तहसीलदार राहाता श्री.कुंदन हिरे  यांच्याकडे जमा करण्यात आल्या आहेत. 

या आंदोलनामध्ये राज्यातील तलाठी संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल यांना पुणे जिल्ह्याच्या ग्रुप वरती एका अधिका-याने वादग्रस्त संदेश टाकला आहे. त्या निषेधार्थ तलाठी संघटना उतरल्या आहेत. 

त्या अधिका-याची त्वरीत बदली करण्याची मागणी केलेली आहे. तलाठी संघाला शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सक्षम व कणखर असा राज्य समन्वयक असावा, असे वाटते, असे निवेदनात म्हटले आहे.जेणेकरुन ही चावडी ई-फेरफार कोई पाणी यात येणाऱ्या अडचणी लवकरात लवकर सोडवले गेले पाहिजेत, असा समन्वयक असण्याची गरज आहे. आज तलाठी वर्गाला शेतकरी वर्गाला अडचणी वेळेत न सुटल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावा लागत आहे.

सक्षम माणूस आल्यास अडचणी लवकर दूर होते, अशी आशा आहे. निवेदन राहाता तालुका तलाठी संघटना अध्यक्ष श्री.झेंडे ,तालुका सरचिटणीस श्री.शिरोळे,मंडळ अधिकारी राहाता श्री.मोहसिन शेख मंडळ अधिकारी लोणी श्री.अनिल मांढरे आदींच्या शिष्टमंडळाने दिले.डीएससी जमा करण्यात आल्या व उद्यापासून नैसर्गिक आपत्ती व निवडणूक वगळता काम बंद आंदोलन केले जाईल.

यावेळी महसूल नायब तहसिलदार श्री रंध्ये यांनी उपस्थित तलाठी मंडळ अधिकारी यांना मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल तलाठी संघाने दिलगिरी व्यक्त करून सहकार्य करण्याचे विनंती यावेळी करण्यात आली आहे.
close