shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भाजपच्या स्वच्छ भारत अभियानाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी दीनानाथ मारणे..!

भाजपच्या स्वच्छ भारत अभियानाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी दीनानाथ मारणे.


इंदापूर । प्रतिनिधी:- इंदापूर तालुक्यातील मौजे तक्रारवाडी येथील युवा नेते दिनानाथ मारणे यांची भारत सरकार राबवत असलेल्या स्वच्छ भारत अभियान या उपक्रमाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. ते माजी मंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे खंदे समर्थक आहेत.  

या निवडी नंतर दीनानाथ मारणे म्हणाले की देशातील सर्व शहरांबरोबर ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशामध्ये राबविणे सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ, सुंदर व पर्यावरणयुक्त देशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हे अभियान राबविण्यास सुरूवात झाली आह व ते पुणे जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार.घर स्वच्छ राहिले तर गाव स्वच्छ राहिल गाव स्वच्छ राहिले तर शहर स्वच्छ राहिल. शहर स्वच्छ राहिले तर राज्य स्वच्छ राहिल,पर्यायाने देशही स्वच्छ राहिल हा या अभियानाचा उद्देश आहे. 

तसेच स्वच्छतेमुळे देशाचे आरोग्यही स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे. देश स्वच्छ करण्याचा संकल्प याच स्वच्छ भारत अभियानातून मांडला आहे.  हा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी मि पुणे जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियान गावोगावी जाऊन राबवून ते अधिक व्यापक करणार आहे.त्यासाठी भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे.
पुणे या ठिकाणी पार पडलेल्या नियुक्ती पत्र वाटप प्रसंगी व्यासपीठावर स्वच्छ भारत अभियान समितीचे समितीचे राष्ट्रीय संयोजक मा.खासदार यशवंत सिंग दरबार, सॅल्यूट तिरंगा चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेशजी झां, मा.डिम्पी जी बजाज, राजेश राय, स्वच्छ भारत अभियान समितीचे समितीचे महाराष्ट्र राज्याचे संयोजक, प्रदेशाध्यक्ष धनंजय दगडेपाटील, अध्यक्ष सचिन देशपांडे, वरिष्ठ उपाध्यक्ष विजय कुलकर्णी, नगरसेवक दिलीप वेडेपाटील, अल्पनाताई वरपे, किरण दगडेपाटील, स्वप्नालीताई सायकर, वृषालीताई चौधरी, जयंत भावे, स्विकृत नगरसेवक वैभव मुरकुटे, बाळा टेमकर, सचिन दांगटपाटील, स्वच्छ भारत अभियान समितीचे महाराष्ट्र राज्य सचिव प्रसाद सरमोकदम, सल्लागार विश्वास पिटके, सहसचिव पै.विशाल उभे, सहसचिव देवेंद्र राजभर, प.महाराष्ट्र अध्यक्ष राहुल शेवाळे, पुणे शहर मिहिला अध्यक्षा कांचनताई कुंबरे, पुणे जिल्हा अध्यक्ष स्वप्निल शहा, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष महेंद्र रेडके, पुणे शहर संघटन सरचिटणीस सागर कडु, पुणे जिल्हा संघटन सरचिटणीस शरद भोते, सरचिटणीस निलेश गोतारणे, ममताताई दांगट, गोरख दगडेपाटील, समिर पाटील, राजेश कुलकर्णी, उल्का मोकासदार, गणेश कोकाटे, सुत्रसंचालक हिमानी चोंधे, सोनाली छत्रे, तसेच, सुरेंद्र कंधारे, राजेश मनगीरे, नितीन भुंडे, अमरजा पटवर्धन, सुहासिनी शिरढोनकर, गायत्री सणस, आदित्य काळे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
close